Ind vs Eng : ……. तर सेमीफायनल न खेळता टीम इंडिया खेळणार थेट फायनल; जाणून घ्या समीकरण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ जुन ।। India vs English T20 World Cup 2024 semi-final : टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 फेरीत लाखो चाहते वर्षानुवर्षे ज्याची वाट पाहत होते तेच भारतीय संघाने केले. सेंट लुसिया येथे सोमवारी झालेल्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 24 धावांनी पराभव केला. या विजयानंतर टीम इंडिया उपांत्य फेरीसाठी पात्र ठरली आहे. 27 जून रोजी दुसऱ्या उपांत्य फेरीत त्याचा सामना इंग्लंडशी होईल. विशेष म्हणजे हा सामना न खेळता टीम इंडिया अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकते. हे अनोखे समीकरण…

खरंतर, भारत आणि इंग्लंड यांच्यातील हा सामना गयाना येथे खेळला जाणार आहे आणि या सामन्यात पावसाचे सावट आहे. यासोबत दुसऱ्या काही कारणास्तव सामना झाला नाही किंवा रद्द झाला तर भारतीय चाहत्यांनी काळजी करण्याची गरज नाही. एका विशेष नियमांमुळे टीम इंडिया सहज फायनलमध्ये पोहोचेल.

गयानामध्ये पावसाचा अंदाज आहे आणि हवामान खराब राहिल्यास दुसरा उपांत्य फेरीचा सामनाही रद्द होऊ शकतो. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आयसीसीने फक्त पहिल्या उपांत्य फेरीसाठी राखीव दिवस ठेवला आहे परंतु दुसऱ्या उपांत्य फेरीसाठी फक्त 4 तास 10 मिनिटे म्हणजे सुमारे 250 मिनिटे अतिरिक्त दिली आहेत. अशा परिस्थितीत या कालावधीत सामना न झाल्यास सामना रद्द होईल आणि त्याचा फायदा भारताला मिळेल.

खरं तर, भारताने सुपर 8 फेरीतील सर्व 3 सामने जिंकले आहेत आणि 6 गुणांसह गट 1 मध्ये पहिले स्थान मिळवून उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले आहे. त्याचवेळी, इंग्लंडने 3 सामन्यांतून 4 गुण आणि 2 विजयांसह 2 गटात दुसरे स्थान मिळवत उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले आहे.

अशा परिस्थितीत, जर आयसीसीने स्पर्धेसाठी बनवलेल्या नियमांच्या आधारे सामना झाला नाही, तर सुपर 8 दरम्यान गुणतालिकेत जो संघ अधिक चांगल्या स्थितीत असेल त्याला पुढे जाण्याची संधी मिळेल. या कारणास्तव, सामना न झाल्यास भारताला पहिल्या स्थानावर राहण्याचा फायदा होईल आणि टीम इंडिया अंतिम फेरीत प्रवेश करेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *