महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ जुन ।। पावसाळ्याच्या तोंडावर शहरी व ग्रामीण भागात भाजीपाल्यासह लसूण, टाेमॅटाेची मागणी वाढली आहे. यामुळे बाजारात भाजीपाल्यांसह लसूण, टाेमॅटाेचे दर गगनाला भिडले आहेत. लसूण 200 ते 250 रुपये किलाे तर टाेमॅटाे 100 रुपयांपासून 300 रुपयांपर्यंत गेला आहे.
नंदुरबार शहरातील बाजारपेठेत दोन आठवड्यापूर्वी लसणाचे भाव 100 ते 120 रुपये किलो होते. परंतु, बाजारपेठेत लसणाची आवक घटल्याने दर 200 रुपये किलो पर्यंत पोहोचले आहेत. अवकाळी पावसाचा फटका लसणाला बसला असून वातावरणाच्या बदलामुळे लसणाच्या उत्पादनात घट झाली आहे.
उत्तर पुणे जिल्ह्याच्या ओतूर आणि मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्व शेतीमालाचे बाजारभाव सध्या चांगलेच तेजीत आहेत. या पुढच्या काळातही बाजार भाव असेच ते चढे राहतील असा अंदाजही व्यक्त केला जात आहे.
दुष्काळी संकट आणि अवकाळी पावसामुळे रोगराई आणि नुकसानीमुळे शेतीमालाच्या उत्पादनात विक्रमी घट झाल्याने आवक घटल्याने बाजारभाव तेजीत आलेत.
बाजार समितीत बाजारभाव (10 किलो)
फ्लॉवर 200 रुपये
कोबी 170
मिरची 350
गवार :- 700
भेंडी :- 550
कांदा :- 250
टोमँटो :- 400 ते 900
डोबळी मिरची:- 500
वांगी :- 250
कारले :- 500
बटाटा :- 270
भाजीपाला (शेकडा)
मेथी :- 3601
कोथिंबीर :- 7001
शेपु :- 4001