AFG vs BAN : कोच ट्रॉटचा इशारा अन् स्लिपमध्ये उभ्या असलेल्या गुलबदीननं थेट पायच धरला; Video व्हायरल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ जुन ।। Gulbadin Naib Fake Cramp Acting Video : अफगाणिस्तानने बांगलादेशसमोर विजयासाठी फक्त 116 धावांचे आव्हान ठेवले होते. अफगाणिस्तानने देखील भेदक मारा करत सामना अटीतटीचा केला. सामन्यात सातत्याने पावसाचा व्यत्यय येत होता. त्यात बॉल टू रन सुरू असेलल्या सामन्यात अफगाणिस्तानचे कोच बाऊंड्री लाईनवरच फेऱ्या मारत होते.

पाऊस, डकवर्थ लुईस अन् नेट रनरेटच्या घाई गडबडीत अफगाणिस्तानचे कोच जोनाथन ट्रॉट यांनी अफगाणिस्तानच्या खेळाडूंना पावसाची शक्यता आहे खेळ थोडा संथ करा असा इशारा केला. कोचचा इशारा शिरस्ता मानत स्लिपमध्ये उभ्या असलेल्या गुलबदीन नैबनं असं काही केलं की अफगाणी खेळाडूंसोबतच बांगलादेशचे खेळाडू देखील हसू लागले.

स्लिपमध्ये उभ्या असलेल्या गुलबदीन नैबने हात उंचावत ट्रॉट यांच्या इशाऱ्याला प्रतिसात दिला अन् थेट पाय धरून क्रॅम्प आल्याचं नाटक करून लागला. त्यानं ज्या तत्परतेनं अन् भाबडेपणानं हे नाट केलं ते पाहून सर्वांनाच हसू आले.

गुलबदीन टीकेचा धनी
गुलबदीनच्या या कृतीवर समालोचक आणि नेटकऱ्यांनी देखील टीका केली. हे खेळभावनेला धरून नाही. सामन्याचा निकालावर परिणाम होईल असं हे मुद्दाम केलेलं कृत्य आहे असे सामालोचक सायमन डल म्हणाले.

कर्णधार राशिद झाला नाराज
दरम्यान, गुलबदीनच्या कृतीनंतर निर्माण झालेल्या गोंधळावर राशिद खानने प्रतिक्रिया दिली. त्याला पहिल्यांदा काय सुरू आहे हेच काळलं नाही. त्यानंतर या संपूर्ण घटनेवर त्यानं नाराजी व्यक्त केली. तो नैबकडे गेला अन् त्याच्या दुखापतीची चौकशी केली.

तेवढ्यात पाऊस आला अन् सर्वांनाच मैदान सोडावं लागलं. यामुळं नैबचा चलाखी लपून गेली. मात्र सामना पुन्हा सुरू झाला. त्यानंतर नैब मैदानात पट्टी बाधून आला. मात्र गोलंदाजी करताना त्यानं पट्टी काढली अन् गोलंदाजी केली. सामना संपल्यानंतर देखील नैबने मैदानात जोरदार स्प्रिंट मारली. त्यामुळं त्याची दुखापत किती खरी किती खोटी याची चर्चा सुरू झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *