महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० जुन ।। Maharashtra Weather update : राज्यात मान्सूनच्या (Monsoon) आगमनानंतर जून महिन्यात हवी तशी वरुण राजाने हजेरी लावली नव्हती. पण गेल्या काही दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढला असून जुलै महिन्याचा पहिला आठवड्यात सर्वत्र पाऊसच पाऊस असणार आहे. गेल्या 24 तासांपासून राज्यातील बहुतांश भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात मध्यम पाऊस पाहिला मिळाला. हवामान विभागाने बुधवार पर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्रात, विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवलीय. दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने कोकण आणि मध्य महाराष्ट्रात 30 जून ते 3 जुलै या चार दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसंच विदर्भातही मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलाय.