लोणावळ्यात वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले.

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ जुलै ।। Lonavala Bhushi Dam : लोणावळ्यातील भुशी डॅम ओव्हरफ्लो झाला आहे. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे भुशी धरण भरल आहे. त्यातच आज रविवार असल्याने पर्यटकांनी भुशी डॅमवर मोठी गर्दी केली आहे. लोणावळ्यातील भुशी डॅमवर एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले आहेत. आपातकालीन कक्षाचे कर्मचारी तातडीने घटनस्थळी दाखल झाले. तातडीने सर्वांचा शोध घेण्यात आला. त्यापैकी तिघांचे मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागलेत. गेलेल्यांचा शोध घेतला जात आहे.

लोणावळ्यात वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी डॅम पाठीमागे असलेल्या डोंगरातील धबधब्यात अन्सारी कुटुंब वाहून गेलं. रेल्वेचा वॉटर फॉल म्हणून हा धबधबा ओळखला जातो. वाहून गेलेल्या 5 जणांमध्ये लहान मुलं आणि महिलांचा समावेश आहे. त्यापैकी तिघांचे मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागलेत. इतर मृतदेह हाती लागले नाहीत. अंधार पडल्यामुळे शोधकार्य थांबलण्यात आले.

लोणावळ्यात गेल्या 24 तासांत 68 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यावर्षी मान्सून महाराष्ट्रात आणि घाटमाथ्यावर लवकर दाखल झाला. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. आता लोणावळ्यात पावसाचं पुनरागमन झाल्याने भुशी धरणही लवकरचं भरण्याची अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *