महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ जुलै ।। खाजगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेचे क्रेडिट कार्ड वापरात असल्यास तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. देशातील खासगी क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक एचडीएफसीने आपल्या क्रेडिट कार्डसंदर्भातील नियमांत बदल केला आहे. हे बदललेले नियम येत्या १ ऑगस्टपासून लागू होणार असून या निर्णयामुळे आता एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे. नेमका हा नवा नियम काय आहे जाणून घेऊ या.
एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरणे महाग होणार असून बँकेने आता तिच्या क्रेडिट कार्डचा वापर करून थर्ड पार्टी प्लॅटफॉर्मवर भाडे देण्यासाठी नवीन शुल्क आकारले जातील अशी घोषणा केली आहे. थर्ड पार्टी प्लॅटफॉर्मवर भाडे द्यायचे असल्यास आता प्रत्येक ट्रान्झिशन्सवर १ टक्के शुल्क आकाराला जाईल. बँकेने क्रेडिट कार्डधारकांनी क्रेड, पे-टीएम, मोबीकिवी, फ्रीचार्जसारख्या थर्ड पार्टी प्लॅटफॉर्मद्वारे केलेल्या भाड्याच्या पेमेंटवर १ टक्के शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. हे शुल्क प्रति व्यवहार रुपये ३,००० रुपये इतके मर्यादित असेल.
शैक्षणिक ट्रान्झिशन्स शुल्क
एचडीएफसीच्या क्रेडिट कार्डचा वापर करून थर्ड पार्टी अॅपवरून शैक्षणिक ट्रान्झिशन केल्यास ट्रान्झिशनच्या १ टक्के शुल्क आकाराला जाईल. जार्जेस क्रेड, पे-टीएम, मोबीकिवी, फ्रिचार्ज या तसेच इतर अॅप्सवर ट्रान्झिशन शुल्क आकारले जातील तर हा ट्रान्झिशन शुल्क ३००० रुपयांपर्यंत वाढू शकतो. शाळा किंवा कॉलेजच्या वेबसाईटवर किंवा त्यांच्या पीओएस मशीनवर जाऊन एचडीएफसीच्या मदतीने ट्रान्झिसन्स केल्यास कोणतेही अतिरिक्त शुल्क लागू होणार नाही.
कन्झ्यूमर क्रेडिट कार्ड ५० हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीसाठी वापरल्यास एक टक्का शुल्क आकाराला जाईल. हा शुल्क ३००० रुपयांपर्यंतही वाढू शकतो. बिझनेस कार्डसाठी ही मर्यादा ७५ हजार रुपये असून इन्सुरन्स ट्रान्झिशन्ससाठी कोणतेच शुल्क आकारले जाणार नाही.
इंधन ट्रान्झिशन शुल्क
कन्झ्यूमर क्रेडिट कार्डचा वापर करून इंधन भरताना १५,०००पेक्षा अधिक रकमेचे ट्रान्झिशन केल्यास १ टक्के शुल्क आकाराला जाईल. हाही शुल्क ३००० रुपयांपेक्षा वाढू शकतो.
ईएमआय प्रोसेसिंग शुल्क
तुमच्या क्रेडिट कार्डचे बील जर तुम्ही ईएमआयमध्ये भरणार असाल तर त्यासाठी आता २९९ रुपयांपर्यंतचा शुल्क आकाराला जाईल. यासह तुमचे आऊटस्टँडिंग अमाऊंट किती आहे यानुसार तुमच्याकडून शुक्ल आकाराला जाईल तर हा शुल्क १०० ते १३०० रुपयांपर्यंत असू शकतो.