Jio Recharge: जिओ कंपनीने बंद केले दोन स्वस्त प्लान, आता फक्त एकच रिचार्ज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ जुलै ।। जिओ कंपनीने अलीकडेच आपल्या रिचार्ज प्लानमध्ये वाढ केली आहे. रिचार्जच्या किंमतीत वाढ केल्याने युजर्सच्या खिशाला मोठा फटका बसला आहे. ३ जुलै २०२४ पासून रिलायन्स जिओ आपल्या मोबाईल रिचार्जच्या किंमतीत वाढ करणार आहे. याचसोबत जिओ कंपनी आपले सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान बंद करणार आहे. कंपनी ३९५ रुपये आणि ५९९ रुपयांचे रिचार्ज प्लान बंद करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या रिचार्ज प्लानमध्ये अनलिमिटेड डेटा उपलब्ध होता.

जिओचे हे दोन्ही प्लान अनलिमिटेड डेटासह उपलब्ध होते. ३९५ रुपयांचा प्लान ८४ दिवसांचा होता. तर १५९९ रुपयांच्या प्लानमझ्ये ३३६ दिवसांची वॅलिडिटी होती. जिओचे हे रिचार्ज प्लान सर्वाधिक लोकप्रिय होते. अनेक लोक हाच रिचार्ज करायचे. परंतु आता हा रिचार्ज प्लान बंद होणार आहे. जिओच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला फटका बसणार आहे. देशभरात सर्वाधिक लोक जिओ सिम कार्डचा वापर करतात. परंतु जिओच्या या निर्णयामुळे त्यांना चांगला फटका बसला आहे.

युजर्स अजूनही प्रीपेड प्लान रिचार्ज करु शकतात. परंतु ३९५ आणि १५५९ रुपयांचे रिचार्ज उपलब्ध नाही. आता जुन्या प्लानमधील फक्त १५५ रुपयांचा प्लान उपलब्ध आहे.परंतु या रिचार्ज प्लामधील डेटा लिमिट कमी करण्यात आली आहे.याआधी १५५ रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लामध्ये ६ जीबी डेटा मिळत होता. मात्र, आता हा फक्त 2GB डेटा मिळतो.

जिओनंतर आता एअरटेल कंपनीनेदेखील आपल्या रिचार्ज प्लानमध्ये वाढ केली आहे. रिचार्ज प्लान २० ते २७ टक्क्यांनी वाढले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *