महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ जुलै ।। दोन दिवसांपूर्वी लोणावळ्याच्या भुशी डॅम परिसरात एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची दुर्घटना घडली होती. या घटनेनंतर राज्यातील सर्व पर्यटनस्थळांवर जाताना काळजी घेण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. अशातच लोणावळ्यातील घटनेनंतर भिमाशंकर अभयारण्य प्रशासन सतर्क झाले असून १ जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, लोणावळ्यातील घटनेनंतर भिमाशंकर अभारण्य प्रशासन सतर्क झाले आहे. भिमाशंकर देवदर्शनानंतर भाविक वन्यजीव पर्यटन आणि धबधब्यांवर जात असतात. अभयारण्यातील अंतर्गत निसरड्या रस्त्यांचा धोका लक्षात घेऊन पर्यटकांचे अपघात रोखण्यासाठी १ जुलै ते ३० सप्टेंबर पर्यत भिमाशंकर अभारण्यात पर्यटकांना प्रवेशबंदी घालण्यात आली आहे.
पर्यटकांसाठी धोकादायक ठिकाणांवर बंदी असताना प्रवेश केल्यास वन्यजीव संरक्षक कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे भिमाशंकर अभयारण्य विभागाकडून जाहिर करण्यात आले आहे.
पर्यटन बंदीची ठिकाणे..
– कोंढवळ धबधबा
– चोंडीचा धबधबा
– खोपीवली क्षेत्र,
– पदरवाडी न्हाणीचा धबधबा नारीवाली सुभेदार धबधबा,
– घोंगळ घाट नाला खांडस ते भिमाशंकर मार्ग
– पदरवाडी शिडी घाट ते काठेवाडी