महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ जुलै ।। Refrigerator : पावसाळा आला आहे आणि हवामान थोडं थंड झालं आहे. पण यासोबतच वाढलेली आर्द्रता आपल्या घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी त्रासदायक ठरू शकते. विशेषतः रेफ्रिजरेटर!म्हणजेच आपला फ्रीज. योग्य तापमान न ठेवल्यास, रेफ्रिजरेटरमध्ये बॅक्टेरिया वाढू शकतात आणि अन्न खराब होऊ शकते.
पावसाळ्यात रेफ्रिजरेटरचे तापमान किती ठेवावे?
तज्ज्ञांच्या मते,रेफ्रिजरेटरचे तापमान कोणत्याही हंगामात 1.7 अंश ते 3.3 अंशांच्या दरम्यान असावे. विशेषतः पावसाळा किंवा इतर हिमवर्षाव हंगामात फ्रीजचे तापमान ५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी ठेवावे. हे तापमान अन्न ताजे आणि सुरक्षित ठेवण्यास मदत करते.
काही महत्वाच्या गोष्टी
रेफ्रिजरेटरचे तापमान नेहमी तपासत रहा. आपण थर्मामीटर वापरून ते तपासू शकता.
दरवाजा नेहमी घट्ट बंद ठेवा. थंड हवा बाहेर पडू नये आणि आर्द्रता वाढू नये याची खात्री करा.
गरम अन्न थंड झाल्यावरच फ्रीजमध्ये ठेवा. उष्ण अन्न ठेवल्याने फ्रीजमधील तापमान वाढू शकते आणि इतर अन्न खराब होऊ शकते.
पावसाळ्यात फ्रीजमध्ये जास्तीत जास्त ताजी फळे आणि भाज्या ठेवा. यामुळे आर्द्रता नियंत्रित राहण्यास मदत होते.
नियमितपणे फ्रीज स्वच्छ करा. यामुळे बॅक्टेरिया आणि बुरशीची वाढ रोखण्यास मदत होईल.
उच्च तापमानात फ्रीज वापरल्यास काय नुकसान होते?
अन्न लवकर खराब होते. त्याच बरोबर त्यातील पोशाक तत्वे निघून जातात.असे अन्न शरीरासाठी धोकादायक ठरू शकते.अन्नावर बॅक्टेरिया आणि बुरशीची वाढ होते.ही बुरशी सहसा पहिल्या काही दिवसात दिवस नाही. पण आपण पाहतो किई बहुदा टोमॅटो फ्रीजमध्ये ठेऊन देखील खराब होतात. कारण त्याच्यामध्ये बॅक्टेरिया तयार झालेले असतात.जास्त तापमानात फ्रीज वापरल्यास विजेचा वापर वाढतो.
फ्रीजचे आयुष्य कमी होऊ शकते,कारण अश्याप्रकारे वापर केल्यामुळे तांत्रिक बिघाड होण्याची शक्यता वाढते.योग्य तापमान राखून तुम्ही अन्न ताजे आणि सुरक्षित ठेवू शकता आणि फ्रीजची लाईफ देखील वाढवू शकता.