Surya Kumar Yadav Catch: सूर्यकुमार यादवला मिळाला आफ्रिकेच्या दिग्गज खेळाडूचा पाठिंबा;

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ जुलै ।। टी-२० वर्ल्ड कप २०२४ चे विजेतेपद भारताने पटकावले. भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिका हा फायनल सामना फार अतीतटीचा रंगला. या सामन्यात भारताने ७ धावांनी विजय मिळवला. बार्बाडोस येथे रंगलेला सामना भारताच्या हातून एकावेळी निसटला होता पंरतु सूर्यकुमार यादवने घेतलेला अविश्वसनीय झेलमुळे हा सामना भारताच्या बाजूने झुकला. सूर्याच्या या झेलवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले असून आता यावर आफ्रिकेच्या माजी दिग्गज खेळाडू शॉन पोलॉकने आपले मत मांडले आहे.

भारताकडून हार्दिक पांड्या शेवटचे षटक टाकत होता. षटकाच्या पहिल्या चेंडूवर डेव्हिड मिलरने लाँग ऑफवर हवेत शॉट खेळला आणि त्या चेंडूवर षटकारच मिळणार होता परंतु सूर्या धावत आला आणि त्याने तो चेंडू पकडला. सूर्याचा हा झेल खूप अवघड तर होता परंतु अगदी तो बाउंड्रीजवळ असल्याने त्याने तो चेंडू हवेत फेकला. सूर्या परत सीमारेषेच्या आत आला आणि हवेतला चेंडू स्वतःच्या हातात पकडत झेल घेतला.

या झेलची सर्वत्र चर्चा झाली आणि या झेलसाठी सर्व स्तरातून सूर्याचे कौतुक करण्यात आले. मात्र, या झेलबाबत काही वादही सुरु आहे काही लोकांचे म्हणणे आहे की, झेल घेताना सूर्याचा पाय सीमेच्या दोरीला लागला. आता या संपूर्ण प्रकरणावर दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज खेळाडू शॉन पोलॉक यांनी आपले मत मांडले आहे. शॉन पोलॉक म्हणाले, “कॅच चांगला होता, कुशल अजिबात हलली नव्हती, खेळात असे घडत राहते त्यात सूर्याचा काहीही संबंध नव्हता, सूर्या कुशलवर उभा नव्हता याउलट त्याने उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन दाखविले. ”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *