Income Tax Return Fees: पगारदारांनो! ITR फाइलिंगसाठी किती शुल्क लागते, CA आणि वेबसाइट किती रुपये घेतात? जाणून घ्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.५ जुलै ।। जुलैचा महिना सुरू झाला आहे आणि आता येत्या काही दिवसांत ITR (आयकर रिटर्न) दाखल करण्याची अंतिम तारीखही जवळ येणार आहे. दरवर्षीप्रमाणे आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी प्राप्तिकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै असून अद्याप किती करदात्यांना आयटीआर दाखल केला आहे ज्याची आकडेवारी सीबीडीटीने जाहीर केलेली नाही. आयकर रिटर्न भरण्याचे अनेक मार्ग असून वेगवेगळ्या प्रकारे आयटीआर भरण्याचे नियम आणि त्याचा खर्चही वेगळा आहे. असे करदाते ज्यांच्या खात्यांचे ऑडिट करण्याची आवश्यकता नाही अशा लोकांनी आयटीआर भरण्याची अंतिम मुदत पाळली पाहिजे. प्लॅटफॉर्म आणि ITR दाखल करण्याशी संबंधित खर्चांची माहिती आपण घेऊ या.

आयकर विभागाच्या पोर्टलद्वारे ITR कसा भरायचा
ITR भरण्याचा सर्वात स्वस्त पर्याय म्हणजे थेट आयकर विभागाच्या वेबसाइटवर जाऊन. करदाते पॅन क्रमांक वापरून वेबसाइटवर लॉग इन करून यामध्ये प्री-परिभाषित टेम्पलेट आणि मेनू आधारित प्रक्रिया आहे. रिटर्न भरल्यानंतर नोकरदार XML फाईलद्वारे सबमिट केले जाऊ शकते. अखेरीस प्रत्यक्ष स्वाक्षरी, आधार प्रमाणीकरण, डिजिटल स्वाक्षरी आणि ऑनलाइन बँकिंगद्वारे रिटर्नची पडताळणी करता येऊ शकते.

चार्टर्ड अकाउंटंट किती शुल्क आकारतात
बहुतेक लोक ITR दरखलं करण्यासाठी चार्टर्ड अकाउंटंटची मदत घेतात जे सामान्यत: संपूर्ण प्रक्रिया हाताळतात. फॉर्म 16 आणि फॉर्म 26AS कागदपत्रांच्या आधारे CA आयटीआर सादर करण्याची तयारी करतात. या प्रकारच्या सेवेसाठी साधारणपणे १,५०० ते २,०० रुपये शुल्क आकारतात. लक्षात घ्या की रिटर्न किती गुंतागुंतीचा आहे यावर अवलंबून चार्टर्ड अकाउंटंट आयटीआर भरण्यासाठी जास्त शुल्कही आकारू शकतात.

थर्ड पार्टी वेबसाइट्सद्वारे ITR फायलिंग
करदाते रिटर्न भरण्यासाठी ClearTax, Tax2Win, TaxBuddy, Quicko यांसारख्या इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मचाही वापर करू शकतात. वरील थर्ड पार्टी प्लॅटफॉर्म वापरकर्ता अनुकूल इंटरफेस प्रदान करतात आणि फाइलिंग प्रक्रियेसाठी करदात्यांच्या मार्गदर्शक म्हणून काम करतात. येथे आयटीआर भरण्यासाटी ५०० ते १,००० रुपये शुल्क भरावे लागेल.

आयकर वेळेवर भरण्याचे महत्त्व
अंतिम मुदतीपर्यंत ITR फाईल केल्यास सर्वप्रथम कायद्यांचे पालन होते ज्यामुळे करदात्यांना कोणताही दंड भरावा लागत नाही. अंतिम मुदतीनंतर आयकर रिटर्न फाईल केल्यास करदात्यांना आयकर कायद्याच्या कलम २३४एफ अंतर्गत दंड भरावा लागतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *