महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ९ जुलै ।। देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अबांनी यांच्या लग्नसोहळ्याचे कार्यक्रम सध्या मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलामधील जीओ वर्ल्ड येथे पार पडत आहेत. असं असतानाच या कार्यक्रमातील अनेक व्हिडीओ, फोटो आणि त्यासंदर्भातील वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत. यातच आता सोशल मीडियावर अंबानींच्या या लग्न सोहळ्यामधील सेलिब्रिटींच्या गर्दीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणातील तरुण पिढीमधील महत्त्वाचं नाव असलेल्या तेजस ठाकरेंनीही डान्स केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अंबानींच्या या लग्न सोहळ्यातील व्हिडीओमध्ये एका हिंदी गाण्यावर नाचणारी व्यक्ती तेजस ठाकरे आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
काय आहे व्हिडीओमध्ये?
अनंत अंबानींच्या लग्नसोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये अनेक सेलिब्रिटी जोडप्यांनी एकत्र डान्स केला. हा डान्स ‘बन्नो की सहेली रेशम की डोरी’ या ‘कभी खुशी कभी गम’ या गाण्यावरील आहे. सदर डान्स परफॉर्मन्समध्ये शेवटच्या ओळीत नाचणाऱ्या व्यक्तीने अनेक मराठी लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. याच व्यक्तीचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. अनेक सोशल मीडिया अकाऊंटवरुन व्हिडीओत दिसणारी व्यक्ती राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे आहेत. करड्या आणि काळ्या रंगाचा कुर्ता परिधान केलेली ही व्यक्ती तेजस ठाकरे आहेत. तेजस ठाकरे हे त्यांची आई रश्मी ठाकरेंबरोबर या सोहळ्याला हजर होते. तेजस यांच्याबरोबर या गाण्यावर अभिनेत्री सारा अली खानबरोबरच तिचा पूर्वीचा प्रियकर वीर परिहारही नाचताना दिसत आहे.
गुजरती अंबानीच्या लग्नात हाय हाय रे अल्ला गाण्यावर शेवटच्या रांगेत थिरकताना मराठी अस्मितेचा झेंडा फिरवणारया कुटुंबाचे छोटे दिवटे ????
pic.twitter.com/HsufQXBiXj— Trupti Garg (@garg_trupti) July 8, 2024