‘मी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तयार…’, स्टार खेळाडूने दिले निवृत्तीतून माघार घेण्याचे संकेत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ९ जुलै ।। आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेनंतर ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नरने आतंरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला होता. ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच त्याने घोषणा केली होती की, टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा ही त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटची स्पर्धा असेल. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघ सुपर ८ फेरीतून बाहेर पडला होता. येत्या २०२५ मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेसाठी डेव्हिड वॉर्नरने निवृत्तीतून बाहेर येण्याचे संकेत दिले आहेत.

डेव्हिड वॉर्नरने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन निवृत्ती घेत असल्याची खात्री करुन दिली आहे. यासह त्याने असे संकेतही दिले आहेत की, संघाला गरज पडल्यास तो या स्पर्धेसाठी उपलब्ध असेल. डेव्हिड वॉर्नरने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ऑस्ट्रेलिया संघाचं प्रतिनिधीत्व करणं ही अभिमानाची बाब आहे. यादरम्यान त्याने फ्रँचायजी क्रिकेट खेळणं सुरु ठेवणार असल्याचंही सांगितलं.

https://www.instagram.com/davidwarner31/?utm_source=ig_embed&ig_rid=5a57dfb0-e4c8-4939-a73e-6e61a3360c48

काय म्हणाला डेव्हिड वॉर्नर?
डेव्हिड वॉर्नरने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत लिहिले की, ‘अध्याय संपला! इतकी वर्ष उच्च स्तरावर खेळणं हा एक अविश्वसनिय अनुभव होता. ऑस्ट्रेलियाचा माझा संघ होता. माझ्या क्रिकेट स्तरावरील बहुतांश वेळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यामध्ये गेला आहे. सर्व फॉरमॅटमध्ये १०० हून अधिक सामने खेळणं ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. मी त्या सर्व लोकांचे आभार मानतो, ज्यांच्यामुळे हे शक्य होऊ शकलं.

तसेच त्याने पुढे लिहिले की, ‘मी आशा करतो की, मी चाहत्याचं मनोरंजन केलं असेल. आम्ही कसोटी क्रिकेटच्या फॉरमॅटमध्ये बदल केला आणि वेगाने धावा केल्या. हे तुमच्या सपोर्टशिवाय शक्य होऊ शकलं नसतं. मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. मी काही वर्ष फ्रँचायजी क्रिकेट खेळणं सुरु ठेवणार. निवड झाल्यास ऑस्ट्रेलियासाठी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्याचीही माझी तयारी आहे.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *