महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ९ जुलै ।। आजकाल मोबाईल आणि लॅपटॉप शिवाय कोणतेही काम करणे अशक्य झाले आहे. वर्क फ्रॉम होमपासून ते ऑनलाइन शॉपिंग पर्यंत सर्व कामे फक्त एका क्लिकवर होतात. यामुळे स्क्रीनचा मोठया प्रमाणात वापर केला जातो. यामुळे गोष्टी तर झटपट होतात. मात्र याचा अतिवापर आपले आरोग्य बिघडवते. स्क्रीनचा जास्त वापर केल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य धोक्यात येते. यामुळे स्क्रीनचा अतिवापर टाळा आणि डोळ्यांचे आरोग्य जपा.
स्क्रीनच्या अतिवापरामुळे शरीराला कोणत्या समस्या उद्भवतात?
स्क्रीनमधून येणाऱ्या निळा प्रकाश डोळ्यांना अधिक घातक असतो. त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य बिघडते.
डोळे कोरडे होतात.
स्क्रीनच्या अतिवापरामुळे डोळ्यांची दृष्टी हरवण्याचा धोका असतो.
सतत डोकेदुखीचा त्रास सुरू होतो.
मायग्रेनचा त्रास सुरू होतो.
डोळ्यातून सतत पाणी येणे.
डोळ्याखाली सूज येणे.
वारंवार डोळे जड होणे.
खांदे दुखी आणि पाठदुखी सुरू होते.
जास्त वेळ स्क्रीन पाहिल्यास नजर कमी होऊ शकते.
डोळ्यांची जळजळ होऊन डोळे लालसर होतात.
तुम्हाल चष्मा लागू शकतो. तसचे आधीच ज्यांना चष्मा आहे त्यांचा नंबर वाढू शकतो.
मानसिक आरोग्य बिघडते.
स्क्रीनचा अतिवापर मेंदूचे आरोग्य धोक्यात आणतो.
स्क्रीन बघताना ब्लू रे प्रोटेक्शन चष्मा लावा.
स्क्रीनचा ब्राइटनेस अधिक नसावा. मर्यादित स्वरुपात ब्राइटनेस ठेवा.
दिवसातून ८ ते ९ तासांवर स्क्रीन पाहू नये.
मोबाईल ,लॅपटॅपची स्क्रीन खूप जवळून बघणे टाळा.
रात्री झोपण्यापूर्वी एक तास आधी स्क्रीन पाहणे टाळा.
तुम्हाला चष्मा असल्यास मोबाईलचा वापर करताना डोळ्यांना चष्मा लावा.
एक टक लावून स्क्रीनकडे पाहू नका. अधून मधून डोळे चालू बंद करत रहा. त्यामुळे मांसपेशीवर ताण पडत नाही.
जास्तीत जास्त दूर बघण्याचा प्रयत्न करा.
आपल्या आहारात पालेभाज्या, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई युक्त पदार्थांचा समावेश करा.
डोळ्यांना योग्य सूर्यप्रकाशात लागावा याची काळजी घ्या.
जर तुम्हाला सतत स्क्रीन पाहायची असल्यास २० ते २५ मिनिटांनी सतत ब्रेक घ्या.
डोळ्यांचा ओलावा जपण्यासाठी दररोज ३ लीटर पाणी प्या.
स्क्रीनवर जास्त वेळ काम करत असल्यास एसीपासून दूर रहा.
डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी दररोज ७ ते ८ तासांची झोप घ्या.
स्क्रीनवर काम करताना अधूनमधून हातांचे, मानेचे व्यायाम करा. यामुळे शरीराची हालचाल होते.
स्क्रीनमुळे डोळ्यांना जास्त त्रास होत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने आय ड्रॉपचा वापर करा.
टीप : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.