पंतप्रधान आवास योजना बोऱ्हाडेवाडी,चऱ्होली येथे बिल्डर मस्त, पालिका सुस्त आणि लाभार्थी त्रस्त

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.१० जुलै ।। चऱ्होली/ बोऱ्हाडेवाडी ।। पंतप्रधान आवास योजना बोऱ्हाडेवाडी व चऱ्होली येथे केंद्र आणि राज्य शासनाच्या धर्तीवर साकरण्यात आलेला 1288 व 1,442 घरांचा गृहप्रकल्प.

या घरांचा ताबा मिळण्याअगोदरच तेथील लाभार्थी नागरिकांकडून सदनिकेच्या किमती गेल्या 2 वर्षापासून व्याजासह वसूल करण्यात आल्या. तरीदेखील तब्बल 2 वर्षाच्या काळानंतर ताबा मिळूनही अद्याप तेथे मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत.

आज दिनांक 09 जुलै रोजी चऱ्होली येथील 03 नंबर बिल्डिंग मधील अंगत शिवणे या सदनिका धारकांच्या राहत्या घरात एका सदनिकेत छताला टांगलेला चालू फॅन कोसळून शिवणे यांच्या मुलाच्या डोक्याला किरकोळ जखम झाली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही. असे प्रकार घडत आल्यास नागरिकांमध्ये सध्या संतापेची लाट उसळून आलेली आहे.

ठिकठिकाणी तुंबलेले चेंबर, नागरिकांची पाण्याची वणवण, सदनिकेत छतातून टपकणारे पाणी, सांडपाणी/ मैला शुद्धीकरण याची दुर्गंधी, वीज गेल्यास पर्यायी सुविधा उपलब्ध नाही, पार्किंग सुविधा नाही, चेंबरचे पाणी जायला पाईपलाईन नाही, सार्वजनिक उत्सव समारंभ व उद्यान याचे काम अजून अद्याप झालेले नाही.
पाण्याच्या टाकीची ऊंची जमिनीलगत असल्याने पावसाचे पाणी पिण्याच्या टाकीत जाण्याची शक्यता. STP मधून प्रक्रिया करून आलेले सांडपाणी आणि पिण्याचे पाणी एकाच ठिकाणी एकलगट असलेला साठा. भरधाव येणारी वाहने (गतिरोधक नाहीत)

अशा अनेक विळख्यांनी वेढलली ही सोसायटी सोसायटी म्हणून आजच्या काळात वावरत आहे. यावर पालिका प्रशासन करवाही करणार का ?
की एखादा बळी जाण्याची वाट बघणार ?

अशा खूप समस्या आज लाभार्थ्यांना आहेत.यावर लवकर जर तोडगा नाही निघाला तर लवकरच याचा भडका होऊन, एक मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभा राहू शकते.

अशा प्रकारे छत गळणे,भिंतीतून पाणी पाझरणे तसेच कॉमन समस्या विषयी बोऱ्हाडेवाडी मोशी येथील लाभार्थी ही त्रस्त असून,पालिका फक्त आम्ही करून देतो बोलतायत पण आता पर्यंत कुठलेही ठोस पाऊल उचलले गेले नाहीत.तरी या वर लवकरात लवकर ठोस निर्णय घेऊन सर्व पेंडिंग कामे पूर्ण करून द्यावेत अन्यथा आम्ही चऱ्होली/ बोऱ्हाडेवाडी येथील एकत्रीत लाभार्थ्यांना घेऊन पालिकेवर मोर्चा काढणार आहोत.

त्रस्त लाभार्थी
पंतप्रधान आवास योजना, चऱ्होली/ बोऱ्हाडेवाडी

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *