महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ८ जुलै ।। डिव्हाईन इंटरनॅशनल फ्यूचर ट्रान्सफॉर्मेशन DIFT फाऊंडेशन व डिफेंस फोर्स लीग च्या वतीने पिंपरी चिंचवडमध्ये कारगिल विजयाचा रजत महोत्सव साजरा करण्यात आला. हॉटेल कलासागर मध्ये या निमित्त “डिव्हाईन हिंदुस्तान प्राइड अवॉर्ड” व “राष्ट्रीय शिक्षा नीती NEP २०२०” वर संवाद आयोजित करण्यात आला होता.
NETF व NAAC चेअरमन डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी आपले विचार मांडताना नवीन शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्याची आवड व त्यांचातील कला कौशल्य यांचा समावेश करण्यात आला आहे असे म्हटले. विद्यार्थ्यांना प्रादेशिक भाषेत शिक्षण व नवीन क्रेडिट पद्धतीमुळे जास्तीत जास्त लाभ होणार आहे . विद्यार्थ्यांचा तांत्रिक कुशलतेत वाढ होण्यासाठी इंटर्नशिप वर भर देण्यात आला आले. नवीन संशोधन व शोध करण्यासाठी सहकार्य व सुविधा वाढवण्यात येणार आहे. ABC अॅकडमिक बँक ऑफ क्रेडिट च्या सुविधेने जर एखाद्या विद्यार्थास एका फील्ड मध्ये शिक्षण अवघड जात असेल तर तो फील्ड बदलू शकतो व त्याचा पूर्वीच्या शिक्षणाचे क्रेडिट्स सुद्धा पुढील फील्ड मदये ग्राह्य धरण्यात येतील.
विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणापासून महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत आंतर्बाह्य ज्ञान घेण्यासाठी डॉ सहस्रबुद्धे यांनी आवाहन केले. भारतीय शिक्षण पद्धतीत मातापित्यास पहिल्या गुरूचे स्थान आहे व त्यांनी ही आपल्या मुलांवर लक्ष दिले पाहिजे असे मत ही त्यांनी मांडले.
या प्रसंगी DFL अवार्ड्स तर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पूर्व सैन्यअधिकाऱ्यांचा हस्ते सत्कार करण्यात आला ज्यात विद्यापीठांचे कुलपति, डायरेक्टर, पालिकेतील अधिकारी, औद्योगिक, क्रीडा , राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर सहभागी होते.
ASM ग्रुप ऑफ इंस्टीट्यूटस चे चेअरमन डॉ. संदीप पाचपांडे यांना शिक्षा क्षेत्रातीत योगदाणासाठी परमवीरचक्र कारगिल योद्धा सुबेदार मेजर संजय कुमार यांचा हस्ते प्राइड अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले. एमप्रॉस् इंटरनॅशनल स्कूल च्या NCC कडेट्स ने मान्यवरांना गार्ड ऑफ ऑनर देऊन स्वागत केले.
हिंदुस्तान प्राइड अवॉर्ड मध्ये – “ Unacademy सेंटर मॅनेजर आकाश राहानगडळे, पिंपरी चिंचवड यूनिवर्सिटी वाइस चॅन्सलर डॉ. माणिमाला पुरी , सीमबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल यूनिवर्सिटी वाइस चॅन्सलर डॉ राजेश इंगळे , सुधारणा सर्विस ट्रस्ट लातूर चे चेअरमन श्री प्रशांत परळकर, पिंपरी चिंचवड पालिकेचे अधिकारी अण्णासाहेब बोधडे, डॉ. डी वाय पाटील कॉलेज पिंपरी मधील डॉ मानसी कुरतकोटी, तिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा प्रोफेसर डॉ भाग्यश्री देशपांडे, एफरो एशियन व अफगाणी स्टूडेंट्स कनेक्शन चे प्रेसिडेंट वाली रहमान रहमाणी यांचा समेत विविध क्षेत्रातील संस्था व व्यक्तींचा समावेश होता.
या उत्सवाचे आयोजन DIFT फाऊंडेशन व डिफेंस फोर्स लीग च्या वतीने संस्थापक श्री नरेश गोल्ला, प्रेसिडेंट – एक्स पैरा कमांडो रघुनाथ सावंत, डायरेक्टर – श्री सुनील वडमारे, कु. दृष्टी जैन DFL टेक्नॉलॉजी चे श्री राजेंद्र जाधव, श्री नीलेश विसपुते, एक्स सुबेदार मेजर यशवंत महाडीक, DFL अवार्ड्स चे श्री सिददाराम बिराजदार, मूजीब खान, ऋषिकेश जाधव, कोमल मोजिद्रा, यांनी केले होते.