महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ जुलै ।। रॉयल एनफिल्डने हंटर 350 लॉन्च करून परवडणाऱ्या बाईक सेगमेंटमध्ये आधीच प्रवेश केला आहे. हंटर 350 येताच बाजारात हिट झाली. Royal Enfield आता भारतात सर्वात स्वस्त आणि लहान इंजिन बाईक घेऊन येत आहे. Autocar च्या रिपोर्टनुसार, कंपनी आपल्या नवीन 250cc इंजिन बाईकवर काम करत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रॉयल एनफिल्डमध्ये नवीन 250 सीसी प्लॅटफॉर्मवर काम खूप दिवसांपासून सुरू आहे. कंपनी ही बाईक अतिशय किफायतशीर स्वरूपात आणू शकते. म्हणजेच हंटर 350 पेक्षा ही बाईक स्वस्त असू शकते. कंपनी नवीन बाईकच्या माध्यमातून तरुणांना टार्गेट करणार आहे.
250cc आणि V-प्लॅटफॉर्मवर आधारित या आगामी बाईकमध्ये अनेक नवीन फीचर्स मिळणार. हे नवीन मॉडेल पुढील वर्षाच्या अखेरीस बाजारात दाखल होऊ शकते. बाईक कोणत्या नावाने येईल आणि तिची किंमत किती असेल? याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. याची किंमत 1.20 ते1.40 लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते.
इलेक्ट्रिक बाईकही होणार लॉन्च
Royal Enfield आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक भारतात लॉन्च करणार आहे. कंपनीने नवीन मॉडेलच्या डिझाइनसाठी पेटंट दाखल केले आहे. कंपनी ही बाईक वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षी ऑटो एक्सपो 2025 मध्ये सादर करू शकते. रॉयल एनफिल्डच्या नवीन इलेक्ट्रिक बाइकमध्ये सिंगल सीट असेल, जी त्याच्या सेगमेंटमधील सर्वात आरामदायक सीट देखील असू शकते.
डिझाईनचे पेटंट पाहता, बॅटरी पॅकसाठीही हीच फ्रेम वापरली जाईल, असं बोललं जात आहे. यात बसवलेले मोटर युनिट दिसणार नाही, ज्यामुळे बाईकचा लूक चांगला दिसेल. ब्रेकिंगसाठी या बाईकमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि दोन्ही टायरमध्ये डिस्क ब्रेकची सुविधा असेल.