महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ जुलै ।। राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून, हवामान खात्याने पुढील १२ तासांसाठी हाय अलर्ट जारी केला आहे. विशेषत: हाय अलर्टवर ठेवलेल्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची अपेक्षा आहे. हवामानाच्या ताज्या अहवालानुसार, महाराष्ट्रात पुढील चार दिवसांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. १७ जुलै ते १९ जुलै या कालावधीत राज्यभर मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने जारी केलेला आहे. काल पावसाचा जोर थोडा कमी झाला असला तरी येत्या काही दिवसांत मुसळधार पावसाची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
मुसळधार पावसाची शक्यता
मुंबईत सध्या ऑरेंज अलर्ट आहे. आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. गेल्या २४ तासांत शहरात मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या. मात्र, त्याची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे. रहिवाशांना सावध राहण्याचा आणि संभाव्य व्यत्ययांसाठी तयार राहण्याचा सल्ला देण्यात आलाय. उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरमध्ये पहाटेपासून पाऊस सुरू आहे. अधूनमधून मध्यम स्वरूपाचा पाऊस (Maharashtra Weather Forecast Update) पडतोय.
रायगड आणि रत्नागिरीसाठी रेड अलर्ट
रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे रेड अलर्ट कायम आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागात आधीच पूरस्थिती निर्माण झाली आहेय. रत्नागिरीलाही रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. याशिवाय ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, परभणी, वर्धा, अमरावती आणि सातारा हे जिल्हे ऑरेंज अलर्टखाली आहेत.पुढील चार ते पाच दिवस कोकणातील (Monsoon Update) काही भागात अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. अधिकारी हाय अलर्टवर आहेत, परिस्थिती व्यवस्थापित करण्यासाठी आवश्यक खबरदारी घेत आहेत.
राज्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता
उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे आज विदर्भात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने महाराष्ट्रासाठी पुढील (Rain Alert) चार दिवसांचे महत्त्व सतत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे तर केरळ, गोवा, कर्नाटक आणि गुजरातसाठीही अलर्ट जारी करण्यात आलेत.
रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग
नवी मुंबईत काल दिवसभराच्या विश्रांतीनंतर रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग सुरू (Rain Update) आहे. सकाळी देखील पावसाचा जोर कायम आहे.रिमझिम पाऊस पडत असल्याने सखल भागात पाणी साचले नाही.धरण क्षेत्रात देखील चांगला पाऊस पडत असल्याने नवी मुंबईकरांना दिलासा मिळालाय. ठाणे शहरात काल दिवसभर विश्रांती घेतलेल्या पावसाला आज पहाटेपासुन पुन्हा सुरुवात झालीय. मुंबईत अनेक ठिकाणी रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत होता.