मुंबई गोवा महामार्गावर प्रवास करणार असाल तर हि बातमी आधी पहा ; दोन दिवस चार तासांचा ब्लॉक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ जुलै ।। मुंबई गोवा महामार्गावर उद्या आणि परवा ब्लॉक घेतले जाणार आहेत. वाहतुक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी याबाबतची वाहतुक अधिकसुचना जारी केली आहे.

कोलाड जवळील पूई येथे नवीन पूलाचे सध्या सुरू आहे. या पुलाचे गर्डर टाकण्याचे काम करण्यासाठी हे ब्लॉक घेतला जाणार आहे. १८ आणि १९ जुलै या दोन दिवसात हा ब्लॉक घेतला जाणार आहे. दुपारी बारा ते सायंकाळी चार या कालावधीत हे ब्लॉक असणार आहे. याकाळात महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतुक बंद ठेवली जाणार आहे. प्रवाश्यांनी तसेच वाहनचालकांनी या काळात पर्यायी मार्गांचा अवलंब करण्यास सांगण्यात आले आहे.

गेल्या १२ वर्षांपासून पळस्पे ते इंदापूर मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडले आहे. रंदीकरण पूर्ण झाले असले तरी कासू ते इंदापूर टप्प्यातील पूलांची कामे रखडली आहेत. ही कामे आता मार्गी लावली जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून कोलाड जवळील पूई येथील नवीन पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. या पूलाचे गर्डर टाकण्याचे काम १८ आणि १९ जूलै दरम्यान केले जाणार आहे. यासाठी सहा मोठे गर्डर आणण्यात आणण्यात आले आहेत.

गर्डर बसविण्यासाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीही पूलाजवळ दाखल झाल्या आहेत. हे काम करतांना वाहतुक बंद ठेवणे गरजेचे असल्याने ठेकेदार तथा महामार्ग विभागामार्फत वाहतुक महासंचालकांकडे वाहतूक बंद ठेवणेबाबत विनंती करण्यात आली होती. त्यानुसार वाहतुक विभाग अप्पर पोलीस माहसंचालक कार्यालयातील पोलीस अधिक्षक अरविंद साळवे याबाबतची वाहतूक प्रतिबंधात्मक अधिसूचना जारी केली आहे.

पर्यायी मार्ग कोणते…
-वाकण पाली येथून वाहतूक भिसेखिंड, रोहा कोलाड मार्गे पुन्हा मुंबई गोवा महामार्गावर जाता येईल.

-वाकण येथून महामार्गावरील वाहतूक पाली, रवाळजे, निजामपूर माणगाव येथे मुंबई गोवा महामार्गाला पुढे जाता येईल.

-या शिवाय खोपोली, पाली, रवाळजे, निजामपूर, माणगाव मार्गे मुंबई गोवा महामार्ग ला पुढे जाता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *