India Schedule at Paris Olympics 2024: आज भारताच्या खात्यात किती पदके? जाणून घ्या पॅरिस ऑलिम्पिकमधील भारतीय सामन्यांचे वेळापत्रक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ जुलै ।। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये काल भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. शूटिंगमध्ये काल मनू भाकरने पहिलं पदक मिळवून दिलं.तिरंदाजीच्या महिला सांघिक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताला नेदरलँडविरुद्ध 0-6 असा पराभव पत्करावा लागला आहे. आजही करोडो भारतीयांच्या नजरा पदकावर आहेत, आजही भारतीय खेळाडूंचे सामने होणार आहेत.

आज तिसऱ्या दिवशी भारताला नेमबाजीत आणखी पदके मिळण्याची अपेक्षा आहे. आज रमिता जिंदाल १० मीटर एअर रायफल महिलांच्या अंतिम फेरीत आणि अर्जुन बबुता १० मीटर एअर रायफल पुरुषांच्या अंतिम फेरीत खेळणार आहेत.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने मिळवले पहिले पदक, मनू भाकरचा कांस्य‘नेम’

आजचे वेळापत्रक

तिरंदाजी –

पुरुष टीम उपांत्यपूर्व फेरी: तरुणदीप राय, धीरज बोम्मादेवरा, प्रवीण जाधव – संध्याकाळी ६.३०

बॅडमिंटन-

पुरुष युगल : सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी विरुद्ध मार्क लॅम्सफस आणि मार्विन सीडेल (जर्मनी – १२-२)

महिला युगल : अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रास्टो वि. नामी मत्सुयामा आणि चिहारू शिदा (जपान) – दुपारी १२.५०

पुरुष एकेरी (ग्रुप स्टेज): लक्ष्य सेन विरुद्ध ज्युलियन कॅरेगी (बेल्जियम) सायंकाळी ५.३० वाजता

नेमबाजी –

१० मीटर एअर पिस्टल मिश्र टीम क्वालिफिकेशन: मनू भाकर आणि सरबज्योत सिंह, रिदम सांगवान आणि अर्जुन सिंह चीमा – दुपारी १२.४५

– पुरुष ट्रॅप क्वालिफिकेशन : पृथ्वीराज तोंडैमन – दुपारी १.००
– १० मीटर एअर रायफल महिला अंतिम : रमिता ज्यु : १ दुपारी 00

– १० मीटर एअर रायफल पुरुषांची अंतिम फेरी: अर्जुन बबुता – दुपारी ३.३०

हॉकी –

पुरुष पूल B सामना: भारत विरुद्ध अर्जेंटिना – सायंकाळी ४.१५

टेबल टेनिस –

महिला एकेरी ( राउंड ऑफ ३२): श्रीजा अकुला विरुद्ध जियान झेंग (सिंगापूर) – रात्री ११.३०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *