महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ जुलै ।। Maharashtra Rain News : राज्यात गेल्या काही दिवसांपासून जारदार बरसत असलेल्या पावसाने २ दिवस विश्रांती घेतल्याचे पहायला मिळत आहे. यातच आता दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता आहे.
काकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील 2 दिवस मराठवाड्यात आणि विदर्भात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Rainfall Warning : Madhya Maharashtra on 28th July -01st August 2024
वर्षा की चेतावनी: 28 जुलाई – 01 अगस्त 2024 को मध्य महाराष्ट्र में :#weatherupdate #rainfallwarning #Maharashtra@moesgoi @ndmaindia @DDNational @airnewsalerts pic.twitter.com/8P1gmJHt8k
— India Meteorological Department (@Indiametdept) July 28, 2024
अंदाजानुसार, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस बरसू शकतो. साताऱ्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोल्हापूरातही अतिवृष्टीची शक्यता आहे. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तर दुसरीकडे आज विदर्भात देखील पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस बरसू शकतो. यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.