8th Pay Commission: नव्या वेतन आयोगासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार, कुठपर्यंत पोहोचली प्रक्रिया, सरकारने स्पष्ट सांगितले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३१ जुलै ।। तुम्ही सरकारी नोकरी करता किंवा तुमच्या घरत एखादा व्यक्ती सरकारी कर्मचारी आहे आणि ८वा वेतन आयोग लागू करण्याची वाट पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सरकारी कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेच्या प्रतीक्षेत असून त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनाही सातत्याने ही मागणी धरत आहेत तर, आता आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत सरकारने भूमिका स्पष्ट केली आहे.

आठवा वेतन आयोगावर सरकारचे नवीन अपडेट
आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले. त्यांनी म्हटले की, ‘जून २०२४ मध्ये आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या स्थापनेसाठी दोन विनंत्या प्राप्त झाल्या असून सध्या असा कोणताही प्रस्ताव सरकारकडे विचाराधीन नाही.’

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन प्रणालीत सुधारणा करण्यासाठी दर दहा वर्षांनी नव्या वेतन आयोगाची स्थापना केली जाते. अखेरीस फेब्रुवारी २०१४ मध्ये सातव्या वेतन आयोगाची स्थापना करण्यात आली तर १ जानेवारी २०१६ पासून या आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात आल्या. अशाप्रकारे आता आठवा वेतन आयोग १ जानेवारी २०२६ रोजी लागू होणे अपेक्षित आहे.

कोट्यवधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना ८व्या वेतन आयोगाचा लाभ
दरम्यान, आठवा वेतन आयोग लागू झाल्यास याचा फायदा सुमारे एक कोटी कर्मचाऱ्यांना होईल ज्यामध्ये सुमारे ४९ लाख कर्मचारी आणि ६८ लाख पेन्शनधारकांचा समावेश आहे. कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा फिटमेंट फॅक्टर पुढील वेतन आयोगापासून वाढेल ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारातही वाढ होईल. फिटमेंट फॅक्टर कर्मचाऱ्यांचे पगार आणि पे मॅट्रिक्स ठरवण्यात मदत करते

सातव्या वेतन आयोगात २.५७ पट फिटमेंट फॅक्टर लागू करण्यात आला ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या किमान पगारात सुमारे १४.२९% वाढ होऊन मूळ वेतन सुमारे १८,००० रुपये झाले आहे. अशा स्थितीत, आठव्या वेतन आयोगातील फिटमेंट फॅक्टर सुमारे ३.६८ पट होऊ शकतो, असा तज्ञांचा विश्वास आहे. असे झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात सुमारे आठ हजार रुपयांची वाढ होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *