‘उद्धव ठाकरे- फडणवीस वाद मिटला नाही तर पुढचा मुख्यमंत्री मीच’

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ ऑगस्ट ।। शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामधील वाद मिटला नाही तर राज्याचा पुढील मुख्यमंत्री मीच असणार असे सर्वात मोठे विधान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. पुण्यामध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

गेल्या दोन दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जोरदर कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. राजकारणात एकतर तु राहशील किंवा मी राहीन असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना थेट इशारा दिला आहे. तर माझ्या नादाला लागाल तर सोडत नाही, असे म्हणत फडणवीस यांच्याकडूनही ठाकरेंना आव्हान देण्यात आले आहे. याबाबतच बोलताना रामदास आठवले यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त रामदास आठवले हे पुण्यामध्ये आले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ठाकरे- फडणवीस वादावर भाष्य केले. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचा वाद जर संपला नाही तर पुढचा मुख्यमंत्री मीच असणार असे रामदास आठवले यावेळी म्हणाले..

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *