Pune News: पुणे शहरात डेंग्यू, चिकनगुनिया आणि टायफाईडचा धुमाकूळ, रुग्णसंख्या 34 वर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ ऑगस्ट ।। शहरात डेंग्यु, चिकनगुनिया, टायफॉइड या आजारांचा संसर्ग वाढलाय. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे आगामी काळात डेंगीच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे. दोन वर्षांखालील आणि दहा वर्षांवरील मुलांमध्ये डेंग्यु होण्याचे प्रमाण जास्त आहे. लहान मुलांमध्ये डेंग्यु वाढत असल्याचं समोर आलंय.

शहरात डेंग्यु, चिकनगुनिया, टायफॉइडचा संसर्ग
साधारण अंगाला सूज येणे, प्लेटलेट्स कमी होणे, तीव्र डोकेदुखी, पुरळ येणे अशी लक्षणे नागरिकांमध्ये दिसून येत आहेत. जुलै महिन्यात पुणे शहरात ३४ रुग्ण आढळून आले होते. जुलैपासून डेंग्युच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली (Dengue Typhoid Chikungunya) आहे. दोन वर्षांखालील आणि दहा वर्षांवरील मुलांना जास्त धोका वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पालकांनी लहान मुलांची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

डेंग्यु आणि काविळने मृत्यू
पुण्यात मुसळधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण (Pune News) झालीय. पुणे महानगरपलिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात दोन विद्यार्थ्यांचा देखील डेंग्यु आणि काविळने मृत्यू झाला होता. या विद्यार्थ्यांच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणी मनसेच्या विद्यार्थी संघटनेने आंदोलन केलं होतं. सिद्धांत खैरे आणि वेदांत सोनवणे या २ विद्यार्थ्यांचा डेंग्यू आणि कावीळने मृत्यू झाल्याचं समोर (Pune Dengue Update) आलं होतं.

नागरिकांना स्वच्छता बाळगण्याचं आवाहन
वसतिगृहातील घाणीचे साम्राज्य, अस्वच्छ पाणी, किळसवाणे स्वच्छतागृह, डासांचे मोठे साम्राज्य, अस्वच्छता, शेजारील डंपिंग ग्राउंड या सगळ्या कारणांमुळे विद्यार्थ्यांचा जीव गेला असल्याचा आरोप केला गेला (Pune Rain) होता. यानंतर आता या वसतिगृहात विद्यार्थांच्या वैद्यकीय चाचणीला पालिकेने कालपासून सुरुवात केलीय. संसर्गजन्य आजारांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना स्वच्छता बाळगण्याचं आवाहन केलंय.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *