Youtube AI : यूट्यूब क्रिएटर्ससाठी खुशखबर! यूट्यूबमध्ये होतीये AIची एंट्री

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ९ ऑगस्ट ।। Youtube AI Feature : यूट्यूब क्रिएटर्ससाठी आनंदाची बातमी आहे.यूट्यूब आपल्या प्लॅटफॉर्मवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून एक नवीन टूल आणत आहे. ‘ब्रेनस्टॉर्म विथ जेमिनी’ नावाच्या या टूलद्वारे क्रिएटर्सना त्यांच्या व्हिडीओसाठी नवनव्या आयडिया मिळण्यात मदत होईल.

ब्रेनस्टॉर्म विथ जेमिनी
युट्यूबर आता फक्त एका क्लिकवर त्यांच्या पुढच्या व्हिडीओची कल्पना शोधू शकतात. ‘ब्रेनस्टॉर्म विथ जेमिनी’ फीचर युट्यूब स्टुडिओमध्ये उपलब्ध असणार आहे. जेव्हा क्रिएटर एखाद्या विषयावर व्हिडीओ बनवण्याचा विचार करेल तेव्हा जेमिनी त्या विषयाशी संबंधित ट्रेंड नोट्स, कन्सेप्ट्स आणि थंबनैल सुचवेल. ही सुचना गुगल सर्चवर होणार्‍या शोधावर आधारित असतील.

युट्यूबला मदत करणार जेमिनी
युट्यूबवर आधीच अनेक क्रिएटर्स आहेत पण आता जेमिनीमुळे त्यांना स्पर्धेत पुढे राहण्यासाठी मदत मिळणार आहे. जेमिनीमुळे क्रिएटर्स युट्यूबवर राहतील आणि इतर प्लॅटफॉर्मवर जालणार नाहीत अशी युट्यूबची रणनीती आहे. जेमिनीमुळे क्रिएटर्सना त्यांच्या व्हिडीओची रणनीती आखण्यास मदत होईल आणि त्यांच्या व्हिडीओज अधिक लोकांपर्यंत पोहोचतील.

युट्यूब सध्या अनेक एआय-आधारित फीचर्सवर काम करत आहे आणि या चाचणीदरम्यान क्रिएटर्सकडून मिळणारा फिडबॅक भविष्यातील विकासाला मार्गदर्शन करेल. हा उपक्रम युट्यूबच्या एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याच्या मर्यादित असल्याचे अधोरेखित करतो. यामुळे युट्यूबवर कंटेंट कसा बनवला जातो आणि शेअर केला जातो यामध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे.

युट्यूब कम्युनिटी नोट्स
युट्यूब फक्त मनोरंजन नाही तर माहितीचा खजिना देखील आहे. पण या खऱ्या माहितीमध्ये अन्य चुकीची माहिती मिसळण्याची शक्यता असते. याचा सामना करण्यासाठी युट्यूब ‘कम्युनिटी नोट्स’ नावाचे नवीन फीचर घेऊन येत आहे. या फीचरमध्ये वापरकर्ते चुकीच्या माहितीखाली संदर्भ आणि लिंक जोडू शकतात.

जूनमध्ये गुगलने या फीचरची घोषणा केली होती आणि आता ते काही निवडलेल्या वापरकर्त्यांसोबत चाचणी घेत आहेत. हे फीचर सगळ्यांसाठी कधी उपलब्ध होईल याची अद्याप माहिती नाही. पण युट्यूब चुकीच्या माहितीविरोधात लढण्यासाठी आणि त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील माहितीची गुणवत्ता सुधारण्यासाठी बांधिलं आहे हे या उपक्रमावरून स्पष्ट होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *