Motor Vehicles Act: खासगी वाहनांवर ‘पोलीस’ लिहिलय तर लगेच हटवा…आता होणार कडक कारवाई

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ९ ऑगस्ट ।। राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्या खासगी वाहनांवर “पोलीस बोध चिन्ह तसेच पोलीस” लिहिलेले आढळून असल्यास त्या वाहनांवर कारवाई होणार आहे. मोटार वाहन अधिनियम, १९८८ व तद्गुषंगीक नियमांतील तरतूदीनुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पत्रकार विकी जाधव यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या खासगी वाहनांवर “पोलीस बोध चिन्ह तसेच पोलीस” लिहणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी अशी तक्रार प्रादेशिक परिवहन कार्यालयाला केली होती.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आदेश-
या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सर्व कार्यरत वायुवेग पथकांमधील मोटार वाहन निरीक्षक तसेच सहा. मोटार वाहन निरीक्षक यांनी तपासणी दरम्यान खासगी वाहनांवर “पोलीस बोध चिन्ह तसेच पोलीस” लिहिलेले आढळल्यास, तसेच वाहनांवर ‘महाराष्ट्र शासन’ अशी पाटी किंवा बांध चिन्हांचा वापर असल्यास, दोषी वाहनांवर मोटार वाहन अधिनियम, १९८८ नियमांतील तरतूदीनुसार काटेकोरपणे कारवाई करावी असे आदेश दिले आहेत.

स.अ. गिरी यांचे आदेश-
सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी स.अ. गिरी यांनी या आदेशानुसार राज्यातील पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्या खासगी वाहनांवर “पोलीस बोध चिन्ह तसेच पोलीस” लिहिलेले किंवा ‘महाराष्ट्र शासन’ अशी पाटी लावण्यात आल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाई केली जाणार आहे. केलेल्या कार्यवाहीचा अहवाल खटला विभागात न चुकता सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

या आदेशामुळे आता राज्यातील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या खासगी वाहनांवर “पोलीस” लिहण्यास मनाई करण्यात आली आहे आणि त्याची अंमलबजावणी कठोरपणे केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *