![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ ऑगस्ट ।। Voter Registration and List Check : हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभेच्या निवडणुकांची तारीख जाहीर झाली आहे. ४ ऑक्टोबरला या निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. निवडणुकांमध्ये सहभाग घ्यायचा असेल आणि मतदान करायचे असल्यास सर्वप्रथम तुमचे नाव मतदार यादीत असणे अत्यावश्यक आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार ओळखपत्र असणे गरजेचे आहे, आणि त्यासाठी मतदार यादीत नाव नोंदवणे आवश्यक आहे.
ही प्रक्रिया खूप सोपी आहे.जर तुम्हालाही तुमचे नाव ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या मतदार यादीत नोंदवायचे असेल किंवा पूर्वी नोंदवलेले नाव यादीत आहे की नाही हे तपासायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
मतदार यादीत नाव कसे नोंदवायचे?
तुमचे नाव मतदार यादीत नोंदवण्यासाठी सर्वप्रथम निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ‘फॉर्म ६’ भरावा लागेल. या फॉर्ममध्ये तुमचे वैयक्तिक तपशील जसे की नाव, पत्ता, पिन कोड, जन्मतारीख आणि संपर्क क्रमांक भरावा लागेल. यासोबतच तुमचे रंगीत फोटो, वयाचा पुरावा, आणि पत्त्याचा पुरावा सादर करावा लागेल.
वैधता
मतदार यादीत नाव आधीच असेल तर ते कसे तपासावे?
जर तुम्ही आधीच नोंदणीकृत मतदार असाल, तर https://electoralsearch.in/ या वेबसाइटवर जाऊन तुमच्या EPIC क्रमांकाने किंवा वैयक्तिक माहिती भरून मतदार यादीत तुमचे नाव आहे का हे तपासू शकता.
नवमतदारांसाठी महत्त्वाचे पाऊल म्हणजे योग्य प्रकारे नोंदणी करून मतदान प्रक्रियेत सहभागी होणे. यासाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध असून, ती सहज आणि सोपी आहे. तुमचा मतदानाचा अधिकार सुनिश्चित करण्यासाठी आजच आम्ही सांगितलेल्या स्टेप्स फॉलो करून मतदार यादीत नाव नोंदवा.
