‘…तर लाडक्या बहिणींना 1500 नाही, 3000 देऊ!’, खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिली ऑफर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ऑगस्ट ।। सध्या महाराष्ट्रात लाडकी बहिण योजनेचं वारं सर्वत्र फिरू लागलंय. महायुती याच योजनेच्या जोरावर विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकण्याची तयारीत आहे. लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी राज्य सरकारनं 199 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली होती. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीमध्ये ही योजना गेमचेंजर ठरणार का? असा सवाल विचारला जातोय. एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा अन् विकासाचा मुद्दा विरोधक उचलून धरत असताना लाडकी बहिण योजनेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोर लावल्याचं दिसतंय. नुकतंच पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या राज्यस्तरीय लाभ वितरणाचा कार्यक्रम पडला. त्यावेळी त्यांनी लाडक्या बहिणींना खुली ऑफर दिली आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?
जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा जेवढा आनंद झाला नव्हता त्याच्या पेक्षा अधिक आनंद या योजनेमुळे होत आहे. आता सर्व पैसे थेट खात्यात जमा होतायेत, कुणीही मधे नाही, जर काँग्रेसचे सरकार असते तर तुम्हाला ४५० रुपये मिळाले असते, असं एकनाथ शिंदे म्हणाले. आम्ही सावत्र कपटी भावांना फक्त पुरून उरलो नाही तर त्यांच्यावर मात केली. जे योजनेत खोडा घालायला आले त्यांना संधी येईल तेव्हा जोडा मारायला विसरू नका, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केली आहे.

…तर 3000 मिळणार
उद्या सरकारची ताकत वाढली तर १५०० हजारचे वाढत वाढत ३००० हजार होतील. आमची त्यापेक्षा सरकारची ताकत वाढली तर आम्ही त्या ही पेक्षा अधिक देऊ, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. महायुती सरकारला मतदान करा असं एकनाथ शिंदे यांचे अप्रत्यक्ष आवाहन केलं आहे.

उद्धव ठाकरेंवर खरमरीत टीका
आम्ही सावत्र कपटी भावांना फक्त पुरून उरलो नाही तर त्यांच्यावर मात केली. जे योजनेत खोडा घालायला आले त्यांना संधी येईल तेव्हा जोडा मारायला विसरू नका. आम्ही सावत्र कपटी भावांना फक्त पुरून उरलो नाही तर त्यांच्यावर मात केली. जे योजनेत खोडा घालायला आले त्यांना संधी येईल तेव्हा जोडा मारायला विसरू नका. मी एकही दिवस घरी बसलो नाही. तोंडाला फेस येईपर्यंत मी फेसबुक वरून बडबड केली नाही, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *