Oppo A Series Smartphone Launch : Oppo A सीरिज स्मार्टफोनची भारतात एंट्री! फक्त 7000 रुपयांपासून मिळतोय ब्रँड मोबाईल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ ऑगस्ट ।। Oppo New Smartphone : लोकप्रिय स्मार्टफोन निर्माता कंपनी ओप्पोने भारतात A सीरिजमध्ये दोन नवे स्मार्टफोन Oppo A3 आणि Oppo A3x 4G लाँच केले आहेत. या दोन्ही फोनमध्ये 6.67 इंचाचा मोठा HD+ डिस्प्ले, दमदार 5100mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन प्रोसेसर दिला आहे. चला तर जाणून घेऊया या दोन्ही फोनमध्ये काय काय खास आहे…

डिस्प्ले
दोन्ही फोनमध्ये 6.67 इंचाचा मोठा HD+ डिस्प्ले दिला आहे. 90Hz रिफ्रेश रेटमुळे व्हिडिओ आणि गेमिंगचा अनुभव खूपच बेस्ट बनतो. तीव्र सूर्यप्रकाशात देखील डिस्प्ले उत्तम प्रकारे दिसतो. कारण, ती 1000 nits पेक्षा जास्त पीक ब्राइटनेस देते.

जबरदस्त परफॉर्मन्स
स्नॅपड्रॅगन 6S Gen 1 चिपसेट आणि 8GB LPDDR4X रॅममुळे फोन अतिशय वेगवान आहे. 256GB स्टोरेजमुळे तुमच्या आवडीनिवडीन्या अॅप्स, गाणी, फोटो आणि व्हिडीओज सहज स्टोअर करता येतात. microSD कार्ड वापरून आणखी जास्त स्टोरेज वाढवता येते. व्हर्च्युअल रॅम टेक्नॉलॉजीमुळे फोनची कार्यक्षमता आणखी वाढते.

कॅमेरा
Oppo A3 4G मध्ये 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. त्यामुळे तुम्ही हाई क्वॉलिटीचे फोटो आणि व्हिडीओ क्लिक करू शकता. सेल्फीसाठी 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. Oppo A3x 4G मध्ये 8 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

बॅटरी आणि इतर फीचर्स
दोन्ही फोनमध्ये 5100mAh ची मोठी बॅटरी आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार ही बॅटरी दिवसभर सहज चालते. 45W फास्ट चार्जिंग सपोर्टमुळे फोन लवकर चार्ज होतो. NFC, 4G Wi-Fi 5, ब्लूटूथ 5.0, USB Type-C पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅकसार फीचर्स या फोनमध्ये आहेत. छोटे नुकसान आणि पाण्यापासून संरक्षण करणारी डिझाईनमुळे फोन टिकाऊ आहे.

Oppo A3 and A3x 4G Smartphone in India
Tesla Walking Job : 7 तास चाला अन् दिवसाला कमवा 28 हजार रुपये! टेस्लाच्या अजब गजब नोकरीची ऑफर,एकदा बघाच

ऑपरेटिंग सिस्टिम
दोन्ही फोन Android 14वर आधारित ColorOS 14 ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतात. त्यामुळे वापरण्यास सोपे आणि तुमच्या आवडीनुसार ते कस्टमाइज करता येते.

किंमत आणि उपलब्धता
Oppo A3x 4G ची किंमत अजून भारतात जाहीर झाली नाही आहे. पण मलेशियन साइटनुसार त्याची किंमत सुमारे 7,500 रुपये ते 11,200 रुपये दरम्यान असू शकते. Oppo A3 ची किंमत आणि उपलब्धता लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. दोन्ही फोन स्पार्कल ब्लॅक, स्टारी पर्पल आणि स्टारलाईट व्हाइट या आकर्षक रंगात उपलब्ध असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *