Badlapur Case: सायकलमुळे प्रायव्हेट पार्टला जखम; बदलापूरमधील शाळा मुख्याध्यापिकेचा धक्कादायक दावा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ ऑगस्ट ।। बदलापूर अल्पवयीन लैंगिक अत्याचार प्रकरणावरुन राज्यभर तीव्र संताप आणि आंदोलने सुरू आहेत. या घटनेची दखल स्वत: मुंबई उच्च न्यायालयाने घेऊन तातडीची सुनावणी देखील घेतली. हायकोर्टाने आपल्या सुनावणीत राज्य सरकार आणि पोलिसांना चांगलंच फटकारलं होतं. लोकांनी रस्त्यावर उतरण्यापर्यंतची वाट तुम्ही पाहाता का, अशा शब्दात सरकारला फटकारलं. याचदरम्यान आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

१३ ऑगस्ट रोजी मुलीच्या पालकांनी तिला खासगी रुग्णालयात नेऊन तिची मेडिकल टेस्ट केली. या टेस्टचा रिपोर्ट २४ तासांनी १४ ऑगस्ट रोजी आला. रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांनी पालकांना मुलीसोबत लैंगिक अत्याचार झाल्याचं सांगितलं. हे समोर आल्यानंतर पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. पालकांनी मुलीचे रिपोर्ट घेऊन थेट शाळा गाठली. त्यांनी शाळेतील वर्गशिक्षिका, मुख्याध्यापिका यांना त्यांच्या मुलीवर शाळेतील कोणतरी लैंगिक अत्याचार केल्याचं सांगितलं. डॉक्टरांनी दिलेला रिपोर्ट त्यांनी शाळेला दिला. यावर शाळेकडून आमच्या शाळेत असं होऊ शकत नाही, हे खोटं आहे. मुलगी सायकलवरुन पडली असेल किंवा सायकलमुळे जखम झाली असेल, असं म्हणत त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत त्यांना शाळेतून बाहेर जाण्यास सांगितलं.

यावर पालकांनी शाळेला आमच्याकडे डॉक्टरांचे रिपोर्ट आहेत, तुम्ही नकार कसं देऊ शकतात असा सवाल केला. पालकांनी शिक्षकांना शाळेतील सीसीटीव्ही चेक करण्याचं सांगितलं, मात्र यावर शाळेकडून मागील १५ दिवसांपासून काही कामासाठी सीसीटीव्ही बंद असल्याचं सांगण्यात आलं. यावर पालकांना मोठा धक्का बसला. शाळेने त्यांच्या तक्रारीची दखल न घेता त्यांना इतर कोणतंही सहकार्य केलं नाही.

पोलीस प्रशासनावरील विश्वास उडाला…
दुसऱ्या दिवशी पोलिसांनी पालकांना तुम्हाला पुन्हा सरकारी रुग्णालयात मेडिकल टेस्ट करावी लागेल असं सांगितलं. १७ ऑगस्टला सकाळी ९ वाजता सरकारी रुग्णालयात येण्यास सांगितलं. मात्र ११.४५ वाजले तरी पोलीस तिथे पोहोचले नव्हते. पुन्हा पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलं. पुन्हा तिथे त्यांना बसवून ठेवण्यात आलं. त्यांना शिवीगाळ झाल्याचा आरोपही पीडित कुटुंबाने केला आहे. तसंच महिला पोलीस ऑफिसर शाळेत जाऊन त्यांची शाळेतील काही लोकांसोबत बंद दाराआड चर्चा झाल्याचं कुटुंबाने सांगितलं. या गुप्त चर्चेनंतर महिला पोलीस अधिकाऱ्याने बाहेर येत मुलीसोबत असं काही घडलं असल्याच्या गोष्टीला नकार दिल्याचं पालकांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *