महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०९ सप्टेंबर ।। आजपर्यंत आपण बहिण भाऊ, पती पत्नी, नणंद भावयज, काका पुतण्या, मामा भाचा अशा राजकीय लढती पाहिल्या पाहिल्या. महाराष्ट्राच्या राजकारणात आता मुलगी बापाला आव्हान देणार आहे. गडचिरोलीच्या अहेरी विधानसभा मतदारसंघात वडील विरुद्ध लेक असा संघर्ष पहायला मिळू शकतो. ही लढत अजित पवार गटासाठी मोठ चॅलेंज असणार आहे. कारण, अजित पवार यांच्या मंत्र्यांची मुलगी थेट वडिलांविरोधात निवडणूक लढवणार आहे.
धर्मारावबाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम हलगीकर शरद पवार पक्षात प्रवेश करणारेत…12 सप्टेंबरला गडचिरोलीच्या अहेरी विधानसभा मतदारसंघात शरद पवार पक्षाची शिव स्वराज यात्रा होत आहे…त्या यात्रेच्याच कार्यक्रमात भाग्यश्री आत्राम शरद पवार पक्षात प्रवेश करणारे…काही दिवसांपूर्वी अनिल देशमुखांनी भाग्यश्री आत्राम शरद पवार पक्षात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली होती…त्याचबरोबर भाग्यश्री आत्रामने शरद पवारांचीही भेट घेतल्याची चर्चा होती…अखेर त्यांच्या पक्षप्रवेशाला मुहूर्त ठरलाय…
शरद पवार पक्षात प्रवेशाची घोषणा होताच भाग्यश्री आत्राम सक्रिय
भाग्यश्री आत्राम यांच्या शरद पवार पक्षात प्रवेशाची घोषणा होताच, त्या सरकारविरोधात आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय…एकीकडे लाडकी बहीण योजनेच्या नावाने भरपूर निधी देता आणि दुसरीकडे अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाकडे लक्ष द्यायचं नाही…फक्त निवडणूक जिंकण्यापुरतीच लाडकी बहीण योजना आहे का? अशा शब्दांत भाग्यश्री आत्राम यांनी राज्य सरकारवर टीका केलीये…भाग्यश्री आत्राम थेट गडचिरोलीतील अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनात सहभागी झाल्या…
अजित पवार यांनी दिला होता इशारा
वस्तादने एक डाव राखून ठेवलाय..तो डाव खेळण्याची वेळ आणू देऊ नका…असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गडचिरोलीत अत्रामांच्या मुलीला इशारा दिला होता. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्रात मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांच्या मुलीला शरद पवार गटातर्फे तिकीट देण्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी इशारा दिला होता. सध्या राजकीय परिस्थिती वेगळी झाली आहे. विरोधकांकडून घरं फोडण्याचे काम सुरू आहे. आत्राम यांनी मुलीला जिल्हा परिषद अध्यक्ष बनवलं. ज्या बापाने जन्म दिला तीच मुलगी आता बापा विरोधात लोकसभा निवडणुकीत उभी राहण्याची भाषा करत आहे. आम्ही चूक केली. त्याबद्दल जाहीरपणे बोललोही. तुम्ही करू नका, बापासोबत रहा. बापापेक्षा लेकीवर प्रेम कुणाचेच नसते. असे भावनिक आवाहन त्यांनी केले. वस्तादने एक डाव राखून ठेवलाय, तो डाव खेळण्याची वेळ आणू देऊ नका असं अजित पवार म्हणाले होते.
