Travis Head च्या वादळात इंग्लड चा धुव्वा ; इंग्लंडची टीम हॅटट्रिकही गेली व्यर्थ, Video

Spread the love

Loading

 

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ सप्टेंबर ।। Australia beat England 1st T20I : ट्रॅव्हिस हेडला रोखणं ( Travis Head) आता अवघड झालं आहे, असं वाटतंय… स्कॉटलंडच्या गोलंदाजांची धुलाई केल्यानंतर हेडने काल इंग्लंडच्या गोलंदाजांना बदडले.. त्याने सॅम कुरनच्या एका षटकात ३० धावा चोपल्या आणि १९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. इंग्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलियन फलंदाजाचे वेगवान अर्धशतक ठरले. इंग्लंडच्या संघानेही टीम हॅटट्रिक घेऊन ऑसींच्या धावगतीला ब्रेक लावला, परंतु विजय त्यांना मिळवता आला नाही.

प्रथम फलंदाजी करताना मॅथ्यू शॉर्ट व हेड यांनी पहिल्या पॉवर प्लेमध्येच ८६ धावा चोपल्या. हेडने सॅम कुरनच्या एका षटकात ३ चौकार व तितकेच षटकार खेचून ३० धावा जोडल्या. तो २३ चेंडूंत ८ चौकार व ४ षटकारांसह ५९ धावा करून माघारी परतला. शॉर्टने २६ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४१ धावा केल्या. कर्णधार मिचेल मार्श, मार्कस स्टॉयनिस, टीम डेव्हिड यांच्या अपयशामुळे धावगती मंदावली. जोश इंग्लिस २७ चेंडूंत ३७ धावा चोपून संघाला १७९ धावांपर्यंत घेऊन गेला.

T20I मध्ये एका षटकात ३०+ धावा करणारे ऑस्ट्रेलियन फलंदाज

२००५ मध्ये रिकी पाँटिंग विरुद्ध डॅरिल टफी

२०२१ मध्ये डॅन ख्रिश्चन विरुद्ध शाकीब अल हसन

२०२४ मध्ये मिचेल मार्श विरुद्ध जॅक जार्विस

२०२४ मध्ये ट्रॅव्हिस हेड विरुद्ध सॅम कुरन

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *