महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ सप्टेंबर ।। Surpriya Sule: राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांची नावे अद्यापही जाहीर झाली नसली तरीही भोर विधानसभा मतदारसंघामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी आमचं ठरलंय असं म्हणत, एकच वादा संग्रामदादा म्हणत महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आमदार संग्राम थोपटे यांचे नाव जाहीर केले आहे.
राजगड तालुक्यात विविध भूमिपूजनांच्या कार्यक्रमानंतर कोंढावळे फाटा येथे एका मंगल कार्यालयात सोमवारी (ता.९) आयोजित केलेल्या कार्यक्रमावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी हे वक्तव्य केले.
यावेळी त्या म्हणाल्या की, महाविकास आघाडीचा फॉर्मुला ठरला असून ज्या ठिकाणी आणि ज्या पक्षाचा उमेदवार निवडून आला असेल त्याच पक्षाचा उमेदवार तिथे दिला जाईल .भोर मतदार संघात काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला उमेदवारी दिली जाईल काँग्रेस पक्ष हा त्यांचा उमेदवार ठरवेल काँग्रेसने जर आम्हाला विचारले कोणाला तिकीट द्यायचे तर आमचं ठरलंय आहे.