Bank Holiday: महाराष्ट्रात आजपासून तीन दिवस बँक का बंद असणार जाणून घ्या…

Spread the love

Loading

हाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ सप्टेंबर ।। RBI कडून महिन्याच्या सुरुवातीला सुट्टीची यादी जाहीर केली जाते. सप्टेंबर महिन्यात बँकाना अनेक सुट्ट्या आहेत कारण या महिन्यात अनेक सण आहेत. शनिवारपासून म्हणजे १४ सप्टेंबरपासून सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. या काळात तुमचे काही महत्त्वाचे काम असेल तर ते आजच पूर्ण करा. बँका बंद राहतील पण ऑनलाइन बँकिंगची (नेट बँकिंग) सुविधा सुरू राहील तर तीन दिवस बँका का बंद राहणार आहेत जाणून घ्या.

या तीन दिवशी सुट्टी असणार…
या आठवड्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये सलग ३ दिवस बँका बंद राहणार आहेत. या सुट्यांमध्ये साप्ताहिक आणि चौथ्या शनिवारचा समावेश आहे. १४ सप्टेंबरला दुसरा शनिवार असल्याने बँकेला सुट्टी आहे. रविवार, १५ सप्टेंबर, साप्ताहिक बँक सुट्टी आणि सोमवार, १६ सप्टेंबर रोजी इद-ए-मिलाद असल्याने देशभरातील सर्व बँका बंद राहणार आहेत. १४ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर या कालावधीत बँकेला सतत सुट्टी असेल.

तुम्हाला काही महत्त्वाच्या कामे उकरून घ्यायची असल्यास जसे की तुम्हाला चेक किंवा ड्राफ्ट जमा करायचा असेल, नवीन खाते उघडायचे असेल किंवा तुमचे केवायसी बाकी असेल, तर आता ती थेट मंगळवारी करता येतील. बँकेच्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही बँकेत जाऊन तुमच्या खात्यातून पैसे काढू किंवा जमा करू शकत नाही.

घरबसल्याही करु शकता बँकेची कामे
तुम्ही चेक क्लिअरन्स, ड्राफ्ट मेकिंग यासारख्या सेवा वापरू शकणार नाही. सध्या जगात इतके डिजीटलायझेशन झाले आहे तर त्याचा फायदा तुम्हाला घेता येईल. डिजीटलायझेशनमुळे ऑनलाइन व्यवहार, मोबाइल बँकिंग, एटीएम सेवा या सुविधा सुरू राहणार आहेत. ऑनलाइन बँकिंग सेवेद्वारे, तुम्ही बॅलन्स चेक, व्यवहार, मिनी स्टेटमेंट इत्यादी विविध सेवा वापरण्यास सक्षम असाल. बँकिंग ॲप किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे घरबसल्या फंड ट्रान्सफर, एफडी खाते उघडणे यासारख्या सेवांचा लाभ घेऊ शकता. जर तुम्हाला पैसे काढायचे असतील तर तुम्ही एटीएम वापरू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *