महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० सप्टेंबर ।। रोज सकाळी देशातील पेट्रोलियम कंपन्या इंधनाचे दर जाहीर करत असतात. पेट्रोल डिझेलच्या किंमती या कच्च्या तेलावर अवलंबून असतात. कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या की पेट्रोल डिझेलचे भाव वाढतात. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किंमती कमी आहेत. तरीही पेट्रोल डिझेलचे भाव कमी होत नाही.
महाराष्ट्रात निवडणुकांचे वारे वाहत आहे. त्यामुळे निवडणुका पाहता पेट्रोल डिझेलच्या भावात दर कपार होणारच नाही, असं सांगता येणार नाही, असा दावा तेल मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या आठवड्यात ब्रेंट क्रूड ऑइल प्रति बॅरल ७० डॉलरच्या खाली आले होते. मागील ३ वर्षात पहिल्यांदाच कच्च्या तेलाच्या किंमती एवढ्या कमी झाल्या होत्या. परंतु याचा कोणताही परिणाम राज्यातील इंधनाच्या भावावर झाला नाही.
मागील दोन ते अडीच वर्षात इंधनाच्या किंमतीत कोणतेही बदल झाले नाहीत. त्यामुळे आता विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी तेल कंपन्या इंधनाचे दर कमी करतील का?असा प्रश्न विचारला असता तेल मंत्रालयाने कोणतेही उत्तर दिले नाही.
मुंबईत गेल्या अनेक महिन्यांपासून पेट्रोल १०३.४४ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ८९.९७ रुपये आहे. लोकसभा निवडणुकांपूर्वी म्हणजे १५ मार्च २०२४ रोजी देशभरात पेट्रोल डिझेलचे भाव २ रुपयांनी कमी झाले होते. त्याआधी २०२२ मध्ये विधानसभा निवडणुकांच्यावेळी पेट्रोल डिझेलच्या दरात कपात झाली होती. त्यामुळे यंदा विधानसभा निवडणुकीपूर्वी पेट्रोल डिझेलचे भाव कमी होणार का याबाबत प्रश्न वाहनधारकांच्या मनात निर्माण झाले आहेत.