सामाजिक कार्यकर्ते अक्षय शिंदे यांचे उपोषण आमदार अमित गोरखे यांच्या आस्वाशनानंतर मागे

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 ऑनलाईन – दि. 29 – मातंग समाजातील विविध मागण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात सामाजिक कार्यकर्ते अक्षय शिंदे हे २१/०९/२०२४ पासुन लाक्षणिक उपोषणाला बसले आहेत. आज आमदार अमित गोरखे यांनी अक्षय शिंदे यांची भेट घेऊन मातंग समाजाच्या विविध मागण्यांचा शासनाकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर प्रश्न सोडवू असे आस्वाशन दिले व त्यानंतर अक्षय शिंदे यांनी आपले उपोषण सोडले .

      सामाजिक कार्यकर्ते अक्षय शिंदे हे  मातंग समाजाच्या विविध मागण्या संदर्भात अन्न त्याग आमरण उपोषणासाठी छत्रपती संभाजीनगर मधील क्रांती चौक येथे बसलेले होते. परंतु आज विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या सर्व मागण्या ऐकून घेतल्या व साकारत्मक चर्चा केली . त्यातील बऱ्याच मागण्या संदर्भात आपण सरकार कडे लवकरच बैठक लावू तसेच मातंग समाजाच्या मागण्या मार्गी लावु असे अश्वसित केल्यानंतर तब्बल आठ दिवसांनी सामाजिक कार्यकर्ते अक्षय शिंदे यांनी आपले उपोषण सोडले.  यावेळी मातंग समाजातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज ,महात्मा फुले ,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ,क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे ,लोकशाहिर अण्णा भाऊ साठे या महापुरुषांच्या नावाने कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या .यावेळी सामाजिक कार्यकर्ते अक्षय शिंदे यांच्या मागण्या समजून घेऊन उपोषण सोडल्याबद्दल आमदार अमित गोरखे यांनी उपस्थीतांचे आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *