महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ ऑक्टोबर ।। मागील आठवड्यात संपूर्ण राज्यात परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यानंतर गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाने उघडीप घेतली. आता पुन्हा एकदा परतीचा पाऊस सक्रिय होणार आहे. हवामान खात्याने आजपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. आज (ता. १) महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे असलेल्या जिल्ह्यांत विजांसह पावसाचा अंदाज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Next 5 days weather warning for Vidarbha Dated 30.09.2024#WeatherForecast #imdnagpur #IMDhttps://t.co/i92bcFAhco@ChandrapurZilla @collectorchanda @KrishiCicr @InfoWashim @Indiametdept @ngpnmc @LokmatTimes_ngp @collectbhandara @CollectorNagpur @CollectorYavatm pic.twitter.com/F4ckEuz7UL
— Regional Meteorological Centre, Nagpur (@imdnagpur) September 30, 2024
उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आयएमडीच्या माहितीनुसार, मध्य प्रदेश आणि परिसरावर असलेल्या वाऱ्यांची स्थिती निवळून गेली आहे. सध्या उत्तर कोकणापासून आग्नेय उत्तर प्रदेशापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश भागात पावसाने उघडीप घेतली आहे. परिणामी कमाल आणि किमान तापमान मोठी वाढ होत आहे.
सोमवारी (ता. ३०) अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तसेच राज्यात अनेक भागातील तापमान पुन्हा ३२ अंशांच्या वर गेले आहे. एकीकडे तापमानाचा पारा वाढत असताना दुसरीकडे राज्यात पुन्हा परतीचा पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे.
आजपासून पुढील ४८ तास कोकणातील सिंधुदुर्ग, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे नगर, पुणे, सातारा, बीड, धाराशिव, लातूरमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील सिंधुदूर्ग जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कोल्हापूर, सांगलीत आज जोरदार पावसाचा अंदाज असून उर्वरित भागात ढगाळ वातावरण राहणार आहे. दरम्यान, पुढील काही दिवसही या भागात पावसाची शक्यता आहे. उर्वरित ढगाळ वातावरण राहणार असून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळतील, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.