Assembly Election 2024: अपक्ष धरून विधानसभेत भाजप इतक्या जागा लढणार; चंद्रकांत पाटील

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ ऑक्टोबर ।। भारतीय जनता पार्टीचे विधानसभेत अपक्ष धरून 112 आमदार आणि इतरांच्या 50 आणि 40 असे असताना स्वाभाविकपणे भाजप 150 ते 160 जागावर लढण्याची शक्यता आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. तसेच आमच्या पक्षात शिस्त हे महत्त्वाचे आहे. देवेंद्र फडणवीस हे इतर दोन पक्षाचे नेते एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करत आहेत. त्यामुळे नेमक्या किती जागा असतील हे फडणवीस सांगतील असे ही ते म्हणाले आहेत. तसेच कोथरूड विधानसभा मला लढवायची आहे. यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील मुरलीधर मोहोळ आणि धनंजय महाडिक यांना देखील मार्गदर्शन करायचं असेही यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. त्याच कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.

5000 मुलींचे कन्या पूजन करणार
राज्यभरात आज मोठ्या उत्साहात आणि व्यक्तिमय वातावरणात नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात देखील घटस्थापना झाली असून लाखो भाविक दर्शनासाठी येत आहेत. आज राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सकाळी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी सर्वांना सुख समृद्धी मिळावी तसेच राज्यात महिला सबलीकरण व्हाव महिला सुरक्षित व्हाव्यात असे साकड त्यांनी अंबाबाई देवीकडे घातलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *