महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ७ ऑक्टोबर ।। आज दुपारी अचानक चिखली मोशी रोडवरील इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या साठा असलेल्या गोडाऊनला आग लागली आहे. या आगीत तीन गोडाऊन मधील इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा माला पूर्णपणे जळून खाक झाला आहे. सुदैवने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसली, तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचा अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाला असून आग आटोक्यात आणण्यासाठी अग्नीच्या बद्दल युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.