महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ७ ऑक्टोबर ।। मुंबईमध्ये मनसेचा 13 ऑक्टोबरला मेळावा होणार आहे. या मेळाव्यातून राज ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. तुम्ही तुमची तयारी सुरू ठेवा मी माझी भूमिका 13 तारखेला स्पष्ट करतो असं या मेळाव्याबद्दल बोलताना राज ठाकरे यांनी सांगितलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीबद्दल राज ठाकरे यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. तुम्ही तयारी सुरू ठेवा, मी माझी भूमिका 13 ऑक्टोबरला स्पष्ट करतो अशा सुचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत.
यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी महाराष्ट्राची सर्कस झाली असल्याचं म्हंटल आहे. कोणी विदूषकी चाळे करत आहे. तर कोणी मंत्रालयाच्या जाळ्यांवरून उड्या मारत आहे. त्यांना जाळ्या नसलेल्या इमारतींवरून उड्या मारायला सांगितल्या पाहिजे, असा टोला देखील यावेली राज ठाकरेंनी लगावला आहे. महाराष्ट्राच्या राजकारण्यांची भाषा खालच्या थराला गेली आहे. त्यांना समजावणार कोणी नाही. ज्याना बुजुर्ग म्हणाव तेच त्यांच्या आहारी लागले आहेत, असंही त्यांनी म्हंटल आहे.