व्हॉट्सअ‍ॅपला टक्कर देण्यासाठी टेलिग्रामनी आणले नवीन फीचर्स

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – ता. २८ जुलै – पुणे – इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपला टक्कर देण्यासाठी टेलिग्राम नवनवीन फीचर आपल्या युजर्ससाठी लाँच करताना दिसत आहे. कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये टेलिग्राम युजर्सची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

आता टेलिग्रामने व्हॉट्सअ‍ॅपला टक्कर देण्यासाठी आणखी काही खास फीचर्स आणले आहेत. टेलिग्रामवर आता 2 जीबीपर्यंतची फाइल शेअर करता येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर केवळ 16 एमबीपर्यंतचीच फाईल शेअर करता येते. याआधी टेलिग्रामवर 1.5 जीबीपर्यंत डेटा शेअर करता येत असे. या नवीन फीचरमुळे युजर्सला मोठे व्हिडीओ पाठविण्यासाठी फायदा होईल.

याशिवाय टेलिग्रामने अँड्राईड युजर्ससाठी नवीन डिझाईनचे म्यूझिक सादर केले आहे. टेलिग्रामचे डेस्कटॉप युजर आता एकसोबत तीन अकाउंट लॉगइन करू शकतात. टेलिग्राम आता प्रोफाईल व्हिडीओ अपलोड करण्याची देखील सुविधा देत आहे. प्रोफाईल व्हिडीओमध्ये फ्रेमचा समावेश करता येईल.

यातील आणखी एक खास गोष्ट म्हणजे कोणाला व्हिडीओ शेअर करण्याआधी व्हिडीओ एडिट देखील करता येईल. प्रोफाईल व्हिडीओला देखील एडिट करणे शक्य आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *