Navratri 2024 : नवरात्रीत अनवाणी चालून तळपायांची होतेय आग, हे घरगती उपाय करा, आराम मिळेल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ९ ऑक्टोबर ।। नवरात्रीचा उपवास प्रत्येकाच्या परंपरेनुसार पाळला जातो. काही भागात कठोर उपवास केला जातो. तर काही ठिकाणी फराळ करून उपवास केला जातो. उपवासाच्या काळात काही लोक चप्पल पाळतात. म्हणजे नऊ दिवस ते चामड्याची कुठलीही वस्तू घालत नाही.

यामध्ये चप्पल ही येते. त्यामुळे नऊ दिवस लोक चपलांपासून दूर राहतात. आज नवरात्रीच्या सातवा दिवस आहे. त्यामुळे अनवाणी चालणाऱ्यांना पाय दुखणे, तळव्यांमध्ये आग होणे अशा समस्या सुरू झाल्या असतील.

काही वेळ पाण्यात पाय असतील तर बरे वाटते पण अनवाणी पायाने देवदर्शनाला जाणे. कडक ऊनामुळे पायांची आग होते. अशावेळी काही छोटे उपाय करून पांच होणाऱ्या थांबवता येते.

हळद (Home remedies for feet burning)
उन्हात चालल्याने पायांचे आग होत असेल तर त्यावर हळदीचा लेप लावता येतो. हळदीमध्ये अँटी इम्प्लिमेंटरी गुणधर्म असतात. जे आपल्या पायाची होणारी आग थांबवण्यासाठी मदत करतात. तुम्ही हळद घेऊन त्याची पेस्ट बनवून घ्या आणि तुमच्या तळव्यांना काही वेळ लावून ठेवा. अर्धा पाऊण तासानंतर तुम्ही पाय थंड पाण्याने धुवा. तुमच्या पायांची आग कमी झाल्याचे निदर्शनास येईल.

विनेगर (home remedies)
तुम्हाला विनेगरच्या अनेक फायदे माहिती असतील. पण तुमच्या पायांच्या आग थांबवण्यासाठी सुद्धा व्हिनेगर फायदेशीर आहे तुम्हाला माहिती नसेल. विनेगर च्या मदतीने पायांच्या हक्कांवरचे असेल तर एक टप भरून गरम पाणी घ्या आणि त्यामध्ये अर्धा कप विनेगर मिक्स करा. या पाण्यात वीस मिनिटं तुमचे काय बुडवून ठेवा. त्वचेचे सुधारते आणि तळव्यांची होणारी आग थांबते.

थंड पाण्याचा वापर (Navratri Health Tips)
पाय पळत असतील तर आपण त्यावर पाणी घेतो. त्यामुळे काही वेळ पाय थंड पडतात. अनवाणी चालल्यामुळे होणारे पायाची जळजळ थांबवण्यासाठी तुम्ही बर्फाच्या पाण्यात पाय बुडवून ठेवा. त्यामुळे पायांना थंडगार शेक मिळेल.

खडे मीठ
पायाच्या तळव्यामध्ये जळजळ होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे नवरात्रीत चप्पल न घालणे होय. तुम्हालाही पायाला आग होत असेल तर खडे मीठ कोमट पाण्यात टाकून त्यामध्ये पाय बुडवून ठेवा. यामुळे, पायात होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळतो.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *