Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
पुण्यात शरद पवारांचा भाजपला मोठा धक्का ; माजी खासदार हाती घेणार 'तुतारी' ? - Maharashtra 24

पुण्यात शरद पवारांचा भाजपला मोठा धक्का ; माजी खासदार हाती घेणार ‘तुतारी’ ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ९ ऑक्टोबर ।। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाने आपली ताकद वाढवली आहे. भाजप आणि अजित पवार गटाचे मोठे नेते आपल्या गळाला लावले आहेत. या सर्व नेत्यांचे पक्ष प्रवेश मोठ्या धूमधडाक्यात होताना दिसत आहेत. अशातच शरद पवारांनी भाजपला आणखी एक मोठा तगडा धक्का दिला आहे. कागल, इंदापूर, फलटणनंतर आता पुण्यात पवारांनी भाजपला खिंडार पाडलं आहे. पवारांनी आपले धक्कातंत्र सुरू ठेवत पुणे जिल्ह्यामध्ये भाजपला दुसरा मोठा धक्का दिला असून भाजपचे माजी खासदार शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत.

कोण आहेत ते माजी खासदार?
माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे भाजपची साथ सोडणार आहेत. दसऱ्यानंतर संजय काकडे यांचा शरद पवार पक्षात प्रवेश होणार आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांची ताकद वाढणार आहे. या आधी शरद पवारांसोबत संजय काकडे यांच्या दोन बैठका झाल्याची माहिती समजत आहे. संजय काकडे यांनी आपल्यासोबत तीन ते चार आमदार प्रवेश करणार असल्याची धक्कादायक माहिती दिली आहे.

माझ्यासोबत 3-4 आमदार प्रवेश करणार आहेत. त्यासोबतच पुण्यातील 22 नगरसेवक सुद्धा माझ्यासोबत येणार असून भाजपचे खूप सहन केले आता निर्णय घ्या असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. माझी आणि देवेंद्र फडणवीस यांची 15 वर्षांपासून मैत्री आहे. त्यामुळे त्यांना एकदा भेटणार आहे. दसऱ्यानंतर मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची प्रतिक्रिया संजय काकडे यांची महाराष्ट्र टाईम ऑनलाईनला प्रतिक्रिया दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *