महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ ऑक्टोबर ।। सण-उत्सवाच्या काळात एकाच दिवसात सोन्याच्या भावात एक हजार १०० रुपयांची वाढ झाली. यामुळे सोने ७७ हजार ३०० रुपये अशा नव्या उच्चांकी भावावर काल पोहोचले होते. आज हा भाव आणखी जास्त वाढला आहे. यासोबतच चांदीच्याही भावात बुधवारी एक हजार ७०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे विविध शहरांतील आजच्या किंमती काय यावर एक नजर टाकू.
विजयादशमीला ६०० रु वाढ होऊन ७६ हजार ६०० रुपयांवर पोहोचलेले सोने तीन दिवस याच भावावर स्थिर राहिले. त्यानंतर १५ ऑक्टोबर रोजी त्यात ४०० रुपयांची घसरण होऊन ते ७६ हजार २०० रुपयांवर आले. त्यानंतर मात्र १६ ऑक्टोबर रोजी त्यात थेट एक हजार १०० रुपयांची वाढ झाली. तसेच आज ७८,२६० रुपये तोळा भाव आहे.
२२ कॅरेट सोन्याचा भाव
२२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ७,१७५ रुपये इतका आहे.
२२ कॅरेट ८ ग्रॅमचा भाव ५७,४०० रुपये आहे.
१० ग्रॅम सोन्याचा भाव आज ७१,७५० रुपये आहे.
१०० ग्रॅम सोन्याचा भाव ७,१७,५०० रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव आज ७,८२६ रुपये आहे.
८ ग्रॅम सोन्याचा भाव आज ६२,६०८ रुपये इतका आहे.
१० ग्रॅम सोन्याचा भाव ७८,२६० रुपये आहे.
१०० ग्रॅम सोन्याचा भाव आज ७,८२,६०० रुपये आहे.
१८ कॅरेट सोन्याचा भाव किती?
१८ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ५,८७१ रुपये आहे.
८ ग्रॅम सोन्याचा भाव ४६,९६८ रुपये आहे.
१० ग्रॅम सोन्याचा भाव आज ५८,७१० रुपये आहे.
१०० ग्रॅम सोन्याचा भाव आज ५,८७,१०० रुपये आहे.
विविध शहरांतील भाव
मुंबई
२२ कॅरेट सोन्याचा भाव – ७,१६० रुपये.
२४ कॅरेट सोन्याचा भाव – ७,८११ रुपये.
पुणे
२२ कॅरेट सोन्याचा भाव – ७,१६० रुपये.
२४ कॅरेट सोन्याचा भाव – ७,८११ रुपये.
जळगाव
२२ कॅरेट सोन्याचा भाव – ७,१६० रुपये.
२४ कॅरेट सोन्याचा भाव – ७,८११ रुपये.
नाशिक
२२ कॅरेट सोन्याचा भाव – ७,१६० रुपये.
२४ कॅरेट सोन्याचा भाव – ७,८११ रुपये.
नागपूर
२२ कॅरेट सोन्याचा भाव – ७,१६० रुपये.
२४ कॅरेट सोन्याचा भाव – ७,८११ रुपये.
चांदीचा आजचा विविध शहरांतील भाव
मुंबई, पुण्यासह, नवी दिल्ली, मेरठ, लुधियाना, अहमदाबाद, कोलकाता या सर्वच शहरांत चांदी ९७,००० रुपये किलोने विकली जात आहे.