महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ ऑक्टोबर ।। सततच्या धमक्यांमुळे सलमान खान याने बुलेटप्रूफ निसान पेट्रोल एसयूव्ही खरेदी केली आहे. या गाडीची किंमत 2 कोटी रुपये आहे. दुबईहून ती मुंबईत थेट आलेली आहे. या एसयूव्हीमध्ये सुरक्षेशी संबंधित अद्ययावत उपकरणे आहेत. बॉम्ब अलर्ट इंडिकेटर आहे. जवळून गोळीबार झाला तर त्यापासून आत बसलेल्या लोकांना कुठलीही हानी होणार नाही, अशा प्रकारच्या खिडक्या या गाडीच्या आहेत.
5 कोटी खंडणीची अभिनेत्याला धमकी
मुंबई वाहतूक पोलिसांना बिष्णोई टोळीच्या नावाने एक मेसेज प्राप्त झाला असून, प्रकरण संपवायचे तर सलमान खानने 5 कोटी रुपये द्यावेत, अन्यथा त्याची गतही बाबा सिद्दीकीप्रमाणे केली जाईल, असे त्यात म्हटलेले आहे.