EPFO Rule: निवृत्तीच्या किमान पेन्शनमध्ये वाढ होणार? EPFOच्या नियमांमध्ये ……

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ ऑक्टोबर ।। प्रत्येक कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट हे असतेच. प्रत्येक महिन्याला आपल्या खात्यातून पीएफ खात्यात काही ठरावीक रक्कम ट्रान्सफर केली जाते. हे पैसे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत जमा होतात. सध्या ईपीएफओच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्याची तयारी सरकार करत आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेत बदल करुन सध्याची किमान पेन्शन ही १००० रुपयांनी वाढवणे, सेवानिवृत्तीच्या वेळी आंशिक रक्कम काढण्याची परवानगी देणे, याचा समावेश करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. या नवीन बदलांमुळे ज्या कर्मचाऱ्यांचे मासिक उत्पन्न १५००० पेक्षा जास्त आहे त्या लोकांना अधिक चांगले कव्हरेज मिळणार आहे. यामध्ये आयटी इन्फ्रास्टक्चरमध्ये बदल करण्याचे आदेश देण्यात आले होती.

EPFO मधील बदलांवर सरकार विचार करत आहे. सरकारने नुकतेच IT इन्फ्रास्टक्चरमध्ये बदल करण्याचे आदेश दिले होते. यामुळे कर्मचाऱ्यांना EPFO मधून पैसे काढणे, बॅलेंस चेक करणे अधिक सोपे होणार आहे.

EPFO मधीन नवीन बदलांमुळे ग्राहकांना प्रत्येक गोष्ट करणे अधिक सोपे जाणार आहे. याबाबत अहवाल देण्यात आला आहे. त्यानुसार, निवृत्तीच्या वेळी पैसे काढण्याची प्रक्रिया अधिक सोपी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे योग्य नियोजन करुन वार्षिक पेन्शनच्या रक्कमेत बदल केला जाऊ शकतो.

अहवालानुसार, वैद्यकीय उपचार, विवाह आणि मुलांचे शिक्षण यांसारख्या गोष्टींसाठी पैसे काढणे अधिक सोपे व्हावे, यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ईपीएफओ प्रणाली अधिक मजबूत व्हावी यासाठी बदल करण्यात येण्यात आली आहे. (EPFO Rules)

EPFO मध्ये बदल झाल्यानंतर पेंमेंट NPS योजनेसारखं काढता येईल.ज्यांचे मासिक पेमेंट १५००० रुपयांपेक्षा जास्त आहेत त्यांच्या पेन्शन योजनेत बदल करण्यासाठी सरकार महत्त्वाची पाऊले उचलत आहेत. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत सध्या पीएफ खातेधारकांना ५० हजारांऐवजी १ लाख रुपये काढता येणार आहे. कोणत्याही आप्तकालीन परिस्थितीत तुम्ही हे पैसे काढू शकतात. (EPFO Rule Change)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *