महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ ऑक्टोबर ।। भाजपने ९९ जणांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांची संभाव्य उमेदवारांची नावेही समोर आली आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे ३९ उमेदवार ठरल्याची माहिती विश्वासनीय सुत्रांनी दिली आहे. कोणत्याही क्षणी ही यादी जाहीर होऊ शकते.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार ठरले आहेत. सर्वांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. अधिकृत उमेदवारी यादी कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे २४ ॲाक्टोबरला इस्लामपूरमध्ये आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. (Maharashtra Politics)
या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार
1. जयंतराव पाटील – इस्लामपूर विधानसभा
2. डॉ. जितेंद्र आव्हाड – कळवा मुंब्रा विधानसभा
3. अनिल देशमुख – काटोल
4. राजेश टोपे – घनसावंगी
5. बाळासाहेब पाटील – कराड ऊत्तर
6. रोहित पवार – कर्जत जामखेड
7. प्राजक्त तनपुरे – राहुरी
8. रोहित पाटील – तासगाव कवठे महांकाळ
9. सुनील भुसारा – विक्रमगड
10. अशोक पवार – शिरूर
11. मानसिंग नाईक – शिराळा
12. शशिकांत शिंदे – कोरेगाव
13. संदीप क्षीरसागर – बीड
14. हर्षवर्धन पाटील – इंदापूर
15. राखीताई जाधव – घाटकोपर पूर्व
16. राजेंद्र शिंगणे – सिंदखेड राजा
17. युगेंद्र पवार – बारामती
18. समरजीत घाटगे – कागल
19. राणी लंके – पारनेर
20. रोहिणीताई खडसे – मुक्ताईनगर
21. प्रभाकर देशमुख – माण खटाव
22. दिलीप खोडपे – जामनेर
23. राजीव देशमुख – चाळीसगाव
24. अमित भांगरे – अकोले
25. प्रतापराव ढाकणे – पाथर्डी
26. दिपीकाताई चव्हाण – बागलाण
27. प्रशांत जगताप – हडपसर
28. सचिन दोडके – खडकवासला
29. देवदत्त निकम – आंबेगाव
30. उत्तमराव जानकर – माळशिरस
31. नंदाताई कुपेकर- बाभूळकर – चंदगड
32. पृथ्वीराज साठे – केज विधानसभा
33. भाग्यश्री आत्राम – अहेरी
34.गुलाबराव देवकर आप्पा – जळगाव शहर
35. प्रदीप नाईक जाधव – किनवट
36. जयप्रकाश दांडेगावकर – वसमत
37. बाबजानी दुराणी – पाथरी
38. विजय भामळे – जिंतूर
39. चंद्रकांत दानवे – भोकरदन