महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ ऑक्टोबर ।। विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरुवात होत आहे. निवडणूक आयोगाकडून अधिसूचना जारी कऱण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाकडून उमदेवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल. राज्यात सभांचा धडाका होणार आहे. प्रचाराचा धुरळा उडेल. (Maharashtra Vidhan Sabha Election)
आजपासून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. तर २९ ऑक्टोबर ही अर्ज भऱण्याची शेवटची तारीख असेल. राज्यातील निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचे माहिती राज्याचे निवडणूक अधिकारी पारकर यांनी दिली.
आज अधिसूचना जारी होईल, त्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. राज्यातील प्रतिष्ठित नेते पूर्णपणे ताकदीने, रॅली काढत आपला उमेदारी अर्ज भरतील. शनिवार-रविवार सुट्टी असल्यामुळे गुरुवार-शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्यास गर्दी होण्याची शक्यता आहे. दरम्यन, अर्ज भरण्यासाठी सर्वसाधारण उमेदवारांसाठी अनामत रक्कम दहा हजार रुपये इतकी आहे. तर एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अनामत रक्कम पाच हजार रुपये इतकी आहे.
शनिवार-रविवारी अर्ज भरता येणार नाहीत –
आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आठ दिवसांचा अवधी आहे. पण चौथा शनिवार आणि रविवार असल्यामुळे उमेदवारी अर्ज भरता येणार नाही. सार्वजनिक सुट्टी असल्याने शनिवार आणि रविवारी उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे प्रत्याक्षात अर्ज भरण्यासाठी सहा दिवसांचाच वेळ असेल. सकाळी ११ ते दुपारी तीन या वेळेतच निवडणूक अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज द्यावा लागणार आहे.
निवडणूक कार्यक्रम कसा आहे?
२२ तारखेपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. २९ ऑक्टोबर अखेरची तारीख असेल. त्यानंतर ३० ऑक्टोबरला अर्जाची छाननी होईल. ४ ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. २० नोव्हेंबर रोजी राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. २३ नोव्हेंबर रोजी राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे.