महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ ऑक्टोबर ।। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने ( राष्ट्रवादी SP) 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. जयंत पाटील, अनिल देशमुख यांच्यासह भाजपमधून आलेल्या बड्या नेत्याला उमेदवारी मिळली आहे. बारामतीत युगेंद्र पवार अजित पवार यांच्याविरोधात लढणार आहेत. महाविकास आघाडीची ही दुसरी यादी आहे. महाविकास आघाडीचा समसमान जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. महाविकास आघाडीमध्ये कोणीही मोठा भाऊ नसल्याचं जागावाटपाच्या सूत्रावरून स्पष्ट होतंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 85, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 85 जागा, तर काँग्रेसला 85 जागा असा हा फॉर्म्युला आहे. महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने आपली 66 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तिन्ही पक्षांना 270 जागा मिळणार आहेत. तर मित्रपक्षांना 18 जागांवर उमेदवार देता येणार आहेत.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीतील उमेदवार
जयंत पाटील – इस्लामपूर
अनिल देशमुख- काटोल
राजेश टोपे- घनसावंगी
बाळासाहेब पाटील- कराड उत्तर
जितेंद्र आव्हाड- कळबा मुंब्रा
शशिकांत शिंदे – कोरेगाव
जयप्रकाश दांडेगावकर- वसमत
गुलाबराव देवकर- जळगाव ग्रामीण
हर्षवर्धन पाटील- इंदापूर
प्राजक्त तनपुरे -राहुरी
अशोकराव पवार- शिरुर
मानसिंगराव नाईक- शिराळा
सुनील भुसारा- विक्रमगड
रोहित पवार- कर्जत जामखेड
विनायकराव पाटील- अहमदपूर
राजेंद्र शिंगणे- सिंदखेडराजा
सुधाकर भालेराव- उदगीर
चंद्रकांत दानवे- भोकरदन
चरण वाघमारे- तुमसर
प्रदीप नाईक- किनवट
विजय भांबळे-जिंतूर
पृथ्वीराज साठे- केज
संदीप नाईक- बेलापूर
बापूसाहेब पठारे- वडगाव शेरी
दिलीप खोडपे- जामनेर
रोहिणी खडसे- मुक्ताईनगर
सम्राट डोंगरदिवे-मुर्तिजापूर
रविकांत बोपछे- तिरोडा
भाग्यश्री अत्राम- अहेरी
बबलू चौधरी- बदनापूर
सुभाष पवार- मुरबाड
राखी जाधव- घाटकोपर पूर्व
देवदत्त निकम- आंबेगाव
युगेंद्र पवार – बारामती
संदीप वर्पे- कोपरगाव
प्रताप ढाकणे- शेवगाव
राणी लंके- पारनेर
मेहबूब शेख- आष्टी
करमाळा-नारायण पाटील
महेश कोठे-सोलापूर शहर उत्तर
प्रशांत यादव- चिपळूण
समरजीत घाटगे – कागल
रोहित आर आर पाटील- तासगाव कवठेमहाकाळ
प्रशांत जगताप -हडपसर
आज राज्यभरात महाविकास आघाडी आणि महायुतीसह अन्य उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलेत.. यामध्ये जयंतराव पाटील यांनी इस्लामपूरमधून, मंत्री छगन भुजबळांनी येवल्यातून तर जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्रा कळवा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय… त्यासोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी वरळी, गुलाबराव पाटील यांनी जळगाव ग्रामीण, संजय राठोडांनी दिग्रस.. विजयकुमार गावित यांनी नंदुरबारमधून तर मनसेच्या राजू पाटील यांनी कल्याण ग्रामिण मतदारसंघातून आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेय..