मावळ मध्ये 17 लाख 75 हजार रोकड जप्त

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ ऑक्टोबर ।। निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने मावळ विधानसभा मतदार संघात विविध ठिकाणी पथकांकडून वाहनांची तपासणी केली जात आहे. मावळच्या शिरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत उर्से टोल नाका परिसरात कारमधून 17 लाख 75 हजार रोकड जप्त केली. खोपोली कडून पुण्याला जात असलेल्या कारची तपासणी केली असता वाहन क्रमांक MH-12,UC-5535 मध्ये रोकड सापडली आहे. कारचालकाकडे चौकशी केली असता त्यांचा कापड व्यवसाय असून ते पुण्यात दिवाळी करता खरेदीस जात असल्याचे सांगितले. मात्र, तपासात तफावत आढळल्याने रक्कम जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेली रक्कम सदानंद आर करलू ,डी सी आय टी , आयकर विभागाकडे पुणे पुढील कार्यवाहिस हस्तांतरित करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *